LIC Strike: बँकांनंतर आता LIC चे कर्मचारी अचानक संपावर; कामे खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:55 PM2021-03-18T12:55:29+5:302021-03-18T12:57:50+5:30

LIC Employee Strike taday: बँकांनी 15 व 16 तारखेला संप पुकारला होता. त्याआधी शनिवार आणि रविवार सुट्या होत्या. गेल्या 7 दिवसांत केवळ दोनच दिवस बँका सुरु होत्या. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर अनिश्तिच काळासाठी सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

LIC Employee Strike: After banks, now LIC employees are on strike today | LIC Strike: बँकांनंतर आता LIC चे कर्मचारी अचानक संपावर; कामे खोळंबली

LIC Strike: बँकांनंतर आता LIC चे कर्मचारी अचानक संपावर; कामे खोळंबली

Next

सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँकांनी आठवड्याच्या सुट्या जोडून दोन दिवस संप पुकारल्याने आधीच त्रास सहन करावा लागलेल्या लोकांना आता एलआयसी कर्मचाऱ्यांनी (LIC Strike) संप पुकारल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने एलआयसीमधून निर्गुतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याविरोधात बुधवारी अचानक या संपाची घोषणा करण्यात आली. (Employees of the Life Insurance Corporation of India (LIC) on a nationwide strike .)


एलआयसीची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली. या एलआयसीमध्ये 114,000 कर्मचारी काम करत असून 29 कोटींहून अधिक पॉलिसीधारक आहेत. 2021 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी LIC चा आयपीओ आणण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच PSU आणि फायनान्शिअल इन्स्टीट्युशन्समधील हिस्सा विकून 1.75 लाख कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आयडीबीआयशिवाय दोन सरकारी बँका आणि जनरल इन्शुरन्स कंपनीतून येत्या आर्थिवर्षांत ही गुंतवणूक काढून घेण्यात येणार आहे. ही रक्कम सरकार सामाजिक आणि विकासाच्या योजनांना अर्थसाह्य देण्यासाठी करणार आहे. 


बँकांनी 15 व 16 तारखेला संप पुकारला होता. त्याआधी शनिवार आणि रविवार सुट्या होत्या. गेल्या 7 दिवसांत केवळ दोनच दिवस बँका सुरु होत्या. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर अनिश्तिच काळासाठी सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. 


ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनने सांगितले की, इंडस्ट्रीमधील अन्य संघटनांसोबत हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने घेतलेला निर्णय फक्त इन्शुरन्स इंडस्ट्रीसाठीच धोक्याचा नाहीय, तर जनता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीदेखील धोक्याचा आहे, असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे The National Federation of Insurance Field Workers' of India (NFIFWI) ने सांगितले की, एलआयसीचे कर्मचारी सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी दोन तास कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. 

Web Title: LIC Employee Strike: After banks, now LIC employees are on strike today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.