शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

IDBIला LICचा आधार; 51 टक्के समभाग विकत घेण्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 23:24 IST

भारतातील सार्वजनिक बँका सध्या बुडित कर्जांच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. आयडीबीआयला एलआयसीने दिलेल्या आधारामुळे बँकेच्या स्थितीत सुधारणा होईल असे तज्ज्ञ सांगत आहेत.

नवी दिल्ली : आयडीबीआयमधून ५१ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यास भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) बोर्डाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती अर्थव्यवहार सचिव एस. सी. गर्ग यांनी दिली. सरकारी मालकीची आयडीबीआय बँक कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. भांडवल उभारण्यासाठी बँक एलआयसीला प्राधान्यकृत समभाग (प्रेफरेन्शिअल शेअर्स) विकणार आहे.एलआयसीच्या बोर्डावर असलेल्या गर्ग यांनी सांगितले की, बँकेला भांडवलाची गरज आहे. भांडवल उभारण्यासाठी बँक प्राधान्यकृत समभाग विक्री पद्धतीचा वापर करणार आहे. आयडीबीआय बँक शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. त्यामुळे या व्यवहाराची पुढची पायरी म्हणून एलआयसी सेबीशी संपर्क करणार आहे. हिस्सेदारी खरेदीस विमा नियंत्रक इरडाने याआधीच मंजुरी दिली आहे. एलआयसीला हिस्सेदारी विकण्यासाठी आयडीबीआय बँक आपल्या संचालक मंडळाची मंजुरी घेईल. त्यानंतर व्यवहाराची पुढील औपचारिकता पूर्ण केली जाईल.गर्ग यांनी सांगितले की, आयडीबीआय ही सरकारी बँक असली तरी बँकेतील सरकारची हिस्सेदारी फारच मर्यादित फक्त ५ टक्क्यांच्या आसपासच आहे. त्यामुळे सेबीच्या नियमानुसार खुला प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता नाही. गरज असेल तर खुल्या प्रस्तावाची औपचारिकता पारही पाडली जाऊ शकते. तथापि, हा फार मोठा मुद्दा नाही.> आयडीबीआयला आधाराची गरजआयडीबीआय बँकेला सध्या 55, 600 कोटी रुपयांचा तोटा बुडित कर्जांमुळे सहन करावा लागत आहे. बुडित कर्जांच्या या प्रश्नावर उत्तर मिळवण्यासाठी बँकेला सध्या पैशाचा निकड आहे. एलआयसीने टाकलेल्या या पावलामुळे सुमारे 13 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक आयडीबीआयमध्ये होणार आहे. आयडीबीआयच्या 2000 शाखांची थेट मदत मिळाल्यामुळे एलआयसीला आपली व्याप्ती वाढविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून त्याचा फायदा एलआयसीच्या ग्राहकांनाही होणार आहे. भारतातील सार्वजनिक बँका सध्या बुडित कर्जांच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. आयडीबीआयला एलआयसीने दिलेल्या आधारामुळे बँकेच्या स्थितीत सुधारणा होईल असे तज्ज्ञ सांगत आहेत.> १३,000 कोटी मिळतीलआयडीबीआय बँकेत एलआयसीची आधीच सात ते साडेसात टक्के हिस्सेदारी आहे. बँकेत बहुतांश हिस्सेदारी व्हावी यासाठी उरलेली हिस्सेदारी खरेदी केली जाईल. या अधिग्रहणानंतर बँकेच्या संचालक मंडळावर एलआयसी आपले किमान ४ सदस्य नेमू शकेल. या व्यवहारातून बँकेला १0,000 ते १३,000 कोटी रुपये मिळतील.

टॅग्स :Indiaभारतbankबँक