शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi on Coronavirus: 'रविवारी पाच वाजता करूया घंटानाद; 'त्या' राष्ट्ररक्षकांना देऊया दाद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 21:21 IST

PM Narendra Modi on Coronavirus: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवाद

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवादराष्ट्ररक्षकांसाठी रविवारी संध्याकाळी पाच वाजता पाच मिनिटं घंटानाद करू- मोदीयेत्या रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचं जगभरातलं वाढतं थैमान, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोना विरोधात लढण्यासाठी देशवासीयांनी येत्या रविवारी जनता कर्फ्यू पाळावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सकाळी ७ ते रात्री ९ वाजता सर्वांनी घरीच थांबावं आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.  गेल्या दोन महिन्यांपासून काही व्यक्ती अविरत काम करत आहेत. सर्वसामान्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी या व्यक्ती अखंडपणे कार्यरत आहेत. त्यांचं आभार येत्या रविवारी मानूया, अशी भावनिक साद मोदींनी घातली. मागील दोन महिन्यांपासून काही माणसं दिवसरात्र काम करताहेत. सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मी यांचं काम सुरूच आहे. दुसऱ्यांसाठी त्यांचं काम सुरू आहे. त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असूनही ते आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. ही मंडळी राष्ट्ररक्षक आहेत. देश त्यांचा आभारी आहे. आपण येत्या रविवारी त्यांना धन्यवाद देऊ.. संध्याकाळी पाच वाजता दरवाजा, खिडकी, गॅलरीत ५ मिनिटं उभे राहून त्यांचे आभार मानू. टाळ्या, थाळ्या, घंटा त्यांना अभिवादन करू. त्यांना सलाम करू, अशी भावनिक साद त्यांनी घातली.  येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू'  करण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजता जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असं मोदींनी म्हटलं. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत, याची तपासणी 'जनता कर्फ्यू'च्या माध्यमातून करूया, अशी साद त्यांनी घातली. युद्धाच्या परिस्थितीत ब्लॅकआऊट केलं जायचं. शत्रू राष्ट्रांना शहरं, गावं दिसू नये म्हणून घरातल्या लाईट्स बंद केल्या जायच्या. काचांना काळे पडदे लावले जायचे. युद्ध संपल्यानंतरही काही महापालिकांनी ब्लॅकआऊटचं मॉकड्रिल सुरू ठेवलं, याचा संदर्भ देत मोदींनी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळण्यात यावा, अशी साद घातली. २२ मार्चला नागरिकांनी घराबाहेर पडू नये. देशाच्या हितासाठी लोकांनी घरी राहावं. राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचं नेतृत्व करावं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी