नागनदी, डम्पिंग यार्डचे प्रस्ताव दोन महिन्यात द्या रामदास कदम : विलंब झाल्यास कारवाई
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
नागपूर: नागपूरमधील नागनदीचे संवर्धन आणि डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यात संबंधित यंत्रणेने राज्य शासनाकडे पाठवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला.
नागनदी, डम्पिंग यार्डचे प्रस्ताव दोन महिन्यात द्या रामदास कदम : विलंब झाल्यास कारवाई
नागपूर: नागपूरमधील नागनदीचे संवर्धन आणि डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यात संबंधित यंत्रणेने राज्य शासनाकडे पाठवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिला.नागपूरचे डम्पिंग यार्ड, नागनदी संवर्धन यासंदर्भात कदम यांनी गुरुवारी रविभवनमध्ये महापालिका,नागपूर सुधार प्रन्यास आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना कदम म्हणाले की, नागनदी आणि डम्पिंग यार्डच्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने दोन महिन्यात सादर करावे,यात विलंब झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागनदी संवर्धनाच्या संदर्भात महापालिकेने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यात काही त्रुटी राहिल्याने तो परत आला आहे. हा सुधारित प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवावा. त्यानंतर याचा आपण स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. डम्पिग यार्डच्या संदर्भात कदम म्हणाले की, कचरा साठवणुकीचा प्रश्न राज्यात सर्व मोठ्या शहरात गंभीर रुप धारण करीत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागपुरातील डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्याची नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात नवीन जागेचा शोध घेतला जात आहे. याविषयीचा सर्वसमावेशक प्रस्ताव दोन महिन्यात सादर करण्यास सांगितले आहे. पर्यावरण आणि नद्या, तलाव संवर्धनासाठी महापालिकांनी २५ टक्के निधी राखून ठेवावा,असे निर्देशही अधिकाऱ्यांना दिल्याचे कदम म्हणाले. (प्रतिनिधी)चौकटपर्यावरण धोरणाबाबतमुख्यमंत्र्यांशी चर्चापर्यावरण धोरणाबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,असे कदम यांनी सांगितले. यापूर्वीच्या धोरणात काही त्रुटी होत्या. त्या दूर करण्याची सूचना आपणच मुख्यमंत्र्यांना केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.