शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...तर इच्छामरण द्या; अवघ्या 2 हजारांची मदत मिळालेल्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 10:26 IST

प्रधानमंत्री किसान निधीतून मिळालेली 2 हजारांची मदत मुख्यमंत्र्यांना पाठवली

लखनऊ: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून अवघ्या दोन हजारांची मदत मिळालेल्या शेतकऱ्यानं इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आग्र्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यानं त्याला मिळालेली तुटपुंजी मदत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवून दिली. मदत देता येत नसेल, तर इच्छामरण द्या, असं पत्र या शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. 39 वर्षीय बटाटा उत्पादक शेतकरी प्रदीप शर्मा यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून मिळालेली 2 हजारांची तुटपुंजी रक्कम योगी आदित्यनाथ यांना पाठवून दिली. 'तुम्ही माझी मदत करू शकत नसाल, तर किमान इच्छामरणाची परवानगी द्या,' असं शर्मा यांनी पत्रात म्हटलं आहे. आपल्या डोक्यावर 35 लाखांचं कर्ज असल्याचं शर्मा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. 'प्रचंड कर्ज, सरकारकडून मिळालेली अपुरी मदत यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण आहे. आमच्याकडे स्वत:चं घर नाही. त्यामुळे आम्हाला भाड्यानं रहावं लागतं. 2016 मध्ये माझ्या पिकाचं नुकसान झालं. त्याची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं. राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र मदत मिळाली नाही,' अशी माहिती शर्मांनी दिली.गेल्या डिसेंबरमध्ये दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. मात्र तरीही रिकाम्या हातानं परतावं लागल्याचं हताश झालेल्या शर्मांनी सांगितलं. 2015 मध्ये कर्जाच्या ओझ्याला कंटाळून माझ्या काकांनी आत्महत्या केली. त्यावेळीदेखील मी या प्रकरणाचं गांभीर्य प्रशासनाच्या कानावर घातलं. मात्र अधिकाऱ्यांनी काहीच केलं नाही, अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नाशिकच्या निफाडमधील संजय साठेंनी कांद्याला अतिशय कमी भाव मिळाल्यानं विक्रीतून झालेली कमाई पंतप्रधान मोदींनी पाठवली होती. साठे यांनी 750 किलो कांदा विकला होता. त्यातून त्यांना अवघे 1 हजार 64 रुपये मिळाले होते.  

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ