नवी दिल्ली : देशातील माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रत नोकरी करणा:या महिलांची पुरुषांच्या तुलनेत केवळ संख्याच कमी आहे, असे नव्हे तर त्यांना मिळणा:या वेतनातही तफावत आहे. एकाच o्रेणीत काम करणा:या पुरुषांपेक्षा महिलांना मिळणारे वेतन कमी असल्याचे दिसून येत आहे.
मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळाने केलेल्या सव्रेक्षणातून ही बाब उघड करण्यात आली आहे. मास्टर सॅलरी इंडेक्स-आयटी सेक्टर रिपोर्ट 2014 या अहवालानुसार देशात आयटी क्षेत्रत काम करणा:या महिलांची संख्या एकूण संख्येच्या तुलनेत केवळ 30 टक्के इतकीच आहे. त्याचबरोबर वेतनातही मोठा फरक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांना 29 टक्के वेतन कमी मिळते, असे म्हटले आहे.
या क्षेत्रतील एका पुरुष कर्मचा:याचे वेतन 359 रुपये 25 पैसे प्रती तास आहे, तर महिला कर्मचा:याचे हेच वेतन 254 रुपये 4 पैसे एवढे आहे. वरिष्ठ पदावर महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक संधी मिळत असल्याने हा फरक असल्याचेही अहवालात म्हटले आहे. पदोन्नतीची संधी 36 टक्के महिलांना मिळते, तर पुरुषांचा विचार करता 52 टक्के कर्मचा:यांना ही संधी मिळते, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
संकेतस्थळाचे विभागीय महासंचालक संजय मोदी यांनी सांगितले, की देशातील सर्वात आधुनिक अशा क्षेत्रतील ही स्थिती चिंताजनक आहे. या अहवालात या क्षेत्रतील महिलांना मिळणा:या रोजगाराच्या संधीबरोबरच वेतनातील फरकाबाबत काही तपशील देण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)