शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला सोडून परदेशात पळालेल्या NRI नवऱ्याला करणार फरार घोषित- मनेका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 10:59 IST

पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाणार आहे.

नवी दिल्ली- पत्नीला भारतात सोडून परदेशात पळून जाणाऱ्या अनिवासी भारतीयांसदर्भात केंद्र सरकार कडक पावलं उचलण्याची तयारी करतं आहे. पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाणार आहे. सरकार कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत.  पत्नीला भारतात सोडून परदेशात जाणाऱ्या व कोर्टाकडून तीन समन्स बजावूनही हजर न राहणाऱ्या पतीला फरार घोषित केलं जाईल. इतकंच नाही, तर भारतातील पतीच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या संपत्तीलाही सील केलं जाऊ शकतं. केंद्रीय महिला-बाल विकास मंत्रायलाने याबरोबरच बाल लैंगिक शोषण थांबविण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. सीआरपीसीमधील बदलानंतर लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासाठी 1 वर्षापर्यंतचा गुन्हा दाखल केला जाईल. पीडित लहान असताना त्याचं लैंगिक शोषण झालं व पीडित आता बालिक असेल तर त्याचं वेळी गुन्हा दाखल केला जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने एनआरआय नवरदेवांच्या फरवणुकीला चाप बसविण्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी कायदा मंत्रायलाला पत्र लिहिलं आहे. विदेशात स्थायिक असलेला पती त्याच्या लग्नानंतर पत्नीला भारतात सोडून निघून जातो. कोर्टाकडून नोटीस पाठविली जाऊनही तो पुन्हा हजर होत नाही. अशा घटनांवर चाप बसविण्यासाठी या लोकांना फरार घोषित केलं जाईल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवरील फरारांच्या यादीत सामिल केलं जाईल, असं महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हंटलं. 

बाल लैंगिक शोषणाच्या कायद्यात बदल करण्याच्या मुद्द्यावर मेनका गांधी यांनी म्हंटलं की, लहानपणी घटना घडली असताना पीडित बालिक झाल्यावरही त्याला न्याय मिळविण्याच्या अधिकाप आहे. यामध्ये काही जोखीम आहेत तसंच खोटी प्रकरण दाखल होण्याचीही शक्यता असल्याने त्यावर विचार केला जाणार आहे. बाल लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सर्वांना न्याय मिळवून देणं, हे आमचं उद्दिष्ट्यं असल्याचं मेनका गांधी यांनी म्हंटलं.  

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी