शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने 'या' नेत्याची केली होती हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 13:22 IST

लोकसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो ह्या मताचा मी असल्याचे ते म्हणाले होते.

नवी दिल्ली - भारतच्या राजकरणात अनेक असे नेते होऊन गेले ज्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. यातील एक म्हणजे माजी लोकसभा अध्यक्ष आणि दिवंगत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी यांचे नाव घेतले जाते. तब्बल १० वेळा ते देशाच्या लोकसभेत निवडून गेले. तर यूपीए सरकारच्या काळात ते लोकसभा अध्यक्ष सुद्धा राहिले. मात्र २००८ मध्ये त्यांनी पक्षाचे आदेश धुडकावून लावल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले होते.१९६८ मध्ये चटर्जी यांनी वकिली सोडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करत राजकरणात एन्ट्री केली. १९७१ मध्ये पहिल्यांदाच ते खासदार झाले. त्यांनतर चटर्जी हे एक-दोन नव्हेत तर चक्क १० वेळा खासदार म्हणून संसदेत गेले होते. २००४ ते २००९ च्या काळात ते लोकसभा अध्यक्ष होते. भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्द्यावर २००८ साली माकपने केंद्रातील मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. चॅटर्जी त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष होते. पक्षानं त्यांना पद सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी तो आदेश धुडकावून लावला. त्यामुळं त्यांना पक्षातून काढण्यात आलं.

सोमनाथ चटर्जी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितेले होते की, माझ्या आयुष्यात सर्वात दुःखाचा काळ म्हणजे, २००८ मध्ये मला पक्षाने लोकसभा अध्यक्ष पद सोडण्याचे आदेश दिले. त्यावेळी पक्षाने जरी सरकारचा पाठींबा काढण्याचे ठरवले होते, मात्र लोकसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो ह्या मताचा मी असल्याचे ते म्हणाले होते.