शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

सोनिया गांधींचे नेतृत्वच ‘काँग्रेसचे ऐक्य’ राखेल

By admin | Updated: May 23, 2016 04:00 IST

सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच नायडू यांचे हे विधान आले आहे.एका मुलाखतीत बोलताना नायडू म्हणाले की, नेतृत्व त्यांची अंतर्गत बाब आहे. सोनियांमुळे काँग्रेस एक आहे, एवढेच मी म्हणू शकतो. त्यांचे नेतृत्व नसते तर काँग्रेसची शकले उडाली असती. मला घराणेशाही मान्य नाही, तरीपण हे माझे स्पष्ट मत आहे. लोकशाहीत घराणेशाही ‘धोकादायक’ आहे; पण काँग्रेस आणि काही लोकांसाठी ती ‘चविष्ट’ आहे. सोनिया गांधी यांनीच पक्षात ऐक्य राखले, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालाचा उल्लेख करून ते म्हणाले की, हे निकाल पाहता एक नेता म्हणून त्यांचे नेतृत्व यशस्वी झाले नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी ‘आत्मपरीक्षणा’चे आवाहन केले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा आमच्या चिंतेचा विषय नाही. तो त्यांचा विषय आहे. त्यांना आपली धोरणे व कार्यप्रणाली यावर नव्याने विचार करावा लागेल. कामाची प्रणाली बदलावी लागेल.पक्षात राहुल गांधी यांचे महत्त्व वाढले आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष पूर्वीपासूनच व्यावहारिकपणे पक्ष चालवत आहेत. याबाबत कोणताही संशय नाही. ते जर पक्षाचे अध्यक्ष झाले तर विरोधी पक्षनेतेही होऊ शकतात. संसदेत त्यांची काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवड झाली तर काहीच अडचण नाही. तेच गेल्या १२ वर्षांपासून कामकाज पाहत आहेत, त्यांना काँग्रेस अध्यक्ष करणार असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा!