शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्ष नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारणारे नेते एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 04:42 IST

सोनिया गांधींना भेटण्याची इच्छा; राहुल गांधी व गटाचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी नाही

-  शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि त्याच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित करणारे पक्षाचे वरिष्ठ नेते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनुसार हे नेते पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा विचार करत आहेत म्हणजे त्यांना पक्षात सध्या जे काही सुरू आहे त्याबद्दल माहिती देता येईल.ही नेते मंडळी राहुल गांधी आणि त्यांच्या अवतीभवती असलेल्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत. सोनिया गांधी यांनी पक्षात सामूहिक नेतृत्वाकडे पक्ष चालवण्याची जबाबदारी सोपवावी किंवा पक्षाच्या कोणा वरिष्ठ नेत्याकडे (मग ते राहुल गांधी असले तरी चालतील) अध्यक्षपद सोपवून एक समूह स्थापन करावा म्हणजे तो पक्ष चालवेल.ग्रुप २३ मधील एका नेत्याने अनौपचारिक चर्चेत मान्य केले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाण्याची शक्यता दिसत नाही. कारण ते ना वरिष्ठ नेत्याचा सल्ला घेतात, ना त्यांच्याशी चर्चा करतात. गांधी यांच्याभोवती  जे लोक आहेत त्यांच्याकडे राजकीय अनुभव नाही. पक्षनेत्यांना हे हवे की, राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. परंतु, पक्षाचा सतत निवडणुकीत होत असलेला पराभव, कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा हे सांगते की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाशी कार्यकर्ता थेट संवाद होत नसल्यामुळे दु:खी आहे.

काही दिवसांपूर्वी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर चर्चा झाली होती. त्यात संकेत दिले गेले होते की, नेतृत्व आपल्या कार्यशैलीत सुधार करील. परंतु, अजून समाधानकारक परिणाम दिसलेले नाहीत. पक्षात निवडणूक घेण्याचा मुद्दाही पुढे सरकलेली नाही. या नेत्याचे म्हणणे होते की, कार्यकारिणी समितीची विधिवत निवडणूक व्हावी म्हणजे तळागाळात मुळे असलेले नेते पक्षाला दिशा देऊ शकतील. या नेत्याने खुलासा केला की, ग्रुप २३ आता नेत्यांचा गट नाही. त्यात मोठ्या संख्येने विभिन्न प्रांतांतील नेते जोडले गेले आहेत. सोनिया गांधी यांना हा गट आपल्या भावना कळवाव्यात असा विचार करत आहे. पक्ष गंभीर संकटातून जात आहे हे खरे. परंतु, त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारीही नेत्यांसह पक्ष नेतृत्वाचीही आहे.कार्यशैलीत सुधारणा नाहीकाही दिवसांपूर्वी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर चर्चा झाली होती. त्यात संकेत दिले गेले होते की, नेतृत्व आपल्या कार्यशैलीत सुधार करील. परंतु, अजून समाधानकारक परिणाम दिसलेले नाहीत. या नेत्याचे म्हणणे होते की, कार्यकारिणी समितीची विधिवत निवडणूक व्हावी म्हणजे तळागाळात मुळे असलेले नेते पक्षाला दिशा देऊ शकतील. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस