शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

नेत्यांनी उतरवली ‘शमी’वरची शस्त्रं!

By admin | Updated: October 2, 2014 12:27 IST

दस:याच्या तोंडावर शमी वृक्षावरची आपापली शस्त्रं काढण्यासाठी नेतेमंडळी जमलेली.) रामदास : नमस्कार उद्धोजी.. ओळखलंत का मला ?

(स्थळ : दस:याच्या तोंडावर शमी वृक्षावरची आपापली शस्त्रं काढण्यासाठी नेतेमंडळी जमलेली.)
रामदास : नमस्कार उद्धोजी.. ओळखलंत का मला ?
उद्धो : (डांगळेंनी दिलेला निळा शर्ट दाखवत) कोण तुम्ही? कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय तुम्हाला ? 
शेट्टी : (जानकरांच्या कानात कुजबुजत) एकवेळ रडणारं लहान मूल हसेल. चिडलेल्या बायकोचा रुसवा सुटेल; पण यांची ‘गट्टी फू’ काही लवकर संपणार नाही. उद्धोजींनी रामदासांना ओळखलं नाही, तिथं आपण कोण ?
जानकर : (समजावणीच्या सुरात) आपल्या अंगावर ‘खाकी चड्डी’ असल्यानं कदाचित गोंधळ झाला असेल त्यांचा. चला, आपणच जाऊन बोलू त्यांच्याशी, उद्याचा काय भरवसा ? वेळ पडली तर पुन्हा जावं लागेल आपल्याला त्यांच्याच वळचणीला.
राज : (झाडाची फांदी हलवत)  ए थांबाùù रे. एकतर माझी शस्त्रं सापडेनात इथली. 
अजितदादा : (खोचकपणो) आठ वर्षापूर्वी ठेवलेली ‘ब्लू-प्रिंट’ बाहेर काढलीय तुम्ही परवाच. आता परत काय शेधताय? 
थोरले काका : (दादांना खुणावत) राजला जास्त डिस्टर्ब करू नका. त्याची शस्त्रं यंदा जेवढी तळपतील, तेवढा आपला फायदा जास्त समजा.
भुजबळ : (तक्रारीच्या सुरात) पण, त्यांच्या शस्त्रंना  धार लावायला माझा दगड वापरू नका म्हणजे मिळविली.
आदित्य : (‘उद्धों’चं बोट धरून उत्सुकतेनं) आपली शस्त्रं कोणती हो पप्पा ùù याच्यात?
उद्धो : (थैली काढत) ही बघ आपली शस्त्रं. याला ‘पूर्वजांची पुण्याई’ म्हणतात. याच्याच जोरावर आपल्याला यंदाही लढायचंय.
आदित्य : (डोक खाजवत) पण, मी मोठा झाल्यानंतरही, ही शस्त्रं पुरतील का शेवटर्पयत ?
तावडे : (कुत्सितपणो) त्यासाठी स्वतचं हुकूमी शस्त्र असावं लागतं. आमचं बघ कसं धारदार शस्त्र !
देवेंद्रपंत : (झाडातून ‘सुरती मोबाईल’ काढून कानाला लावत) हॅलो भाईùùजी. नरेंद्र भाईने अय्यां क्यारे मोकलावशो.. येमनो बॉम्ब जोरमा फोडशू.
जानकर : (खूश होऊन) लवकर मागवा ‘मोदीबॉम्ब’. सगळ्यात पहिला तो माङयाच भागात फोडायचाय.
पृथ्वीराज : (फांदीवरच्या फायली काढत) आता ‘दादागिरी’ विरोधात मला लढायचं असेल, तर खोक्यात भिजलेल्या ‘फायली’ ओपन केल्याच पाहिजेत.
तटकरे : (अस्वस्थ होत) दादाùù सिंचनाच्या पाण्यात बुडायचं नसेल तर  झाडातला ‘वॉटरप्रूफ ड्रेस’ काढा अगोदर बाहेर. .अन् आपली शस्त्रं कुठायत काका?
थोरले काका : (क:हाडच्या उंडाळकर काकांकडं बघत) आपण नेहमी दुस:यांच्या शस्त्रनं लढत असतो. 
विजयदादा : (खोतांना डिवचत) काय सदाभाऊùù तुमची ‘शिट्टी’ हरवली की काय? गुपचूप एकटेच कोप:यात शांतपणो उभारलात.
शेट्टी : (खवळून) त्यांचं शस्त्र नसतं कधी कुठं झाकून ठेवलेलं. बघायचंच का तुम्हाला? मग ऐका ùù
सदाभाऊ : (अस्सल गावरान भाषेत आपली मराठी ‘साहित्यसेवा’ दाखवत) 77 777 77 !
(टीप : आता हे ऐकण्यासाठी कुणीही जागेवर नसतं, हे सांगण्याची गरज नसावी!)
      - सचिन जवळकोटे