शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील ‘लष्कर’चे वरिष्ठ नेतृत्व नेस्तनाबूत, लवकरच शांतता नांदण्याची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:19 IST

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.

श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला.काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या कारवाईची जबाबदारी असलेल्या १५ व्या कॉर्पस््चे ध्वजाधिकारी लेफ्ट. जनरल जे. एस. संधू यांनी सांगितले की, गेले काही महिने सैन्याने सीमेपलीकडून होणाºया घुसखोरीविरुद्ध सातत्याने कारवाई केल्याने काश्मीरमधील परिस्थिती लक्षणीय सुधारली आहे. शनिवारी हाजिन भागात झालेल्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये ओवैद, झरगार आणि मेहमूद या लष्कर-ए-तैयबाच्या तीन प्रमुख म्होरक्यांचा समावेश असून या कारवाईमुळे ‘लष्कर’चे नेतृत्व संपुष्टात आले आहे. (वृत्तसंस्था)>यंदा १९० अतिरेक्यांना टिपलेजनरल संधू यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा आतापर्यंत लष्कराने काश्मीरमध्ये १९० अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यापैकी ११० सीमेपलीकडून आलेले होते, तर ८० स्थानिक होते. ठार केलेल्या ११० पैकी ६६ अतिरेक्यांना सीमा ओलांडताना टिपले गेले.काश्मीरच्या अंतर्गत भागात १२५ ते १३० अतिरेकी मारले गेले. यावरून सीमा ओलांडताना जसे अतिरेकी मारले जात आहेत तसेच आधीपासून येऊन राज्याच्या अंतर्गत भागांत गेलेल्यांनाही टिपले जात आहे, हे यावरून दिसते, असे ते म्हणाले.दहशतवादाकडे वळलेल्या अनेक तरुणांना त्या वाटेवरून परत आणण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अनेकांची तशी इच्छा असते पण त्यासाठी नेमके काय करावे हे त्यांना कळत नाही. त्यांच्यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे.शुक्रवारी श्रीनगरजवळ झाकुरा येथे झालेला हल्ला ‘इसिस’ने केल्याचा दावा या दहशतवादी संघटनेच्या‘अ‍ॅमॅक’ वृत्तसंस्थेने केला होता.जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी मात्र याचा इन्कार केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी