शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधींसह नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, नंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 07:02 IST

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य नेते राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य नेते राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली. अटक आणि ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांत सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, आनंद शर्मा, अजय माकन, के. सुरेश, जयराम रमेश, कुमार शैलजा, रणदीप सिंग सुरजेवाला, एच. के. पाटील, पवन कुमार बन्सल, विवेक बन्सल, राजीव सातव, कुलजीत नाग्रा, डॉ. चेला कुमार, भक्त चरण दास, देवेंदर यादव, मनीष चत्रथ, दीपेंदर सिंग हुडा, कुलदीप बिष्णोई, सुनील जाखड, गोविंद सिंग दोतासरा, सयद नासीर हुसैन, प्रदीप तमटा, सुष्मिता देव आणि इतरांचा समावेश आहे. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली. 

...तर त्यांनाही अतिरेकी ठरवतील -राहुल गांधी तीनही कृषी कायदे सरकार जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलक शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोपवून परत आल्यानंतर ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी टीका ऐकण्यासाठी तयार नाहीत. जो कोणी त्यांच्या विरोधात उभा होतो त्याला अतिरेकी ठरविले जाते. मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत का असेनात. जर तेही त्यांच्याकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करतील तर मोदी त्यांनाही अतिरेकी ठरवतील. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संप