शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

बाळासाहेबांसारखीच एका झटक्यात 'मुंबई बंद' करण्याची ताकद असलेला नेता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 11:46 IST

एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंदची हाक दिल्यावर मुंबई पूर्णतः ठप्प व्हायची.

ठळक मुद्देकामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंदची हाक दिल्यावर मुंबई पूर्णतः ठप्प व्हायची.

मुंबई- कामगार नेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं आहे. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. तसेच बाळासाहेबांप्रमाणे त्यांनीही मुंबई बंद पाडून दाखवली होती. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. एकेकाळी समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबई बंदची हाक दिल्यावर मुंबई पूर्णतः ठप्प व्हायची.जॉर्ज यांची टॅक्सी चालक-मालक संघटना होती. तसेच मुंबईतील वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या बेस्टमध्येही त्यांची युनियन होती. महापालिकेतील कामगार वर्ग आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना जॉर्ज यांनी संघटित केले होते. जॉर्ज यांच्या सर्वांना सामावून घेण्याच्या व्यक्तिमत्त्वामुळेच सर्वच क्षेत्रातील कामगार त्यांच्या पाठीशी होते. जॉर्ज यांच्या राजकीय बंदलाही या सगळ्या कामगार संघटना पाठिंबा देत मुंबई ठप्प करायच्या. तसेच ट्रेन बंद पाडण्यासाठी तेव्हा जॉर्ज यांचे कार्यकर्ते रुळांवर उतरून आंदोलन करायचे. विशेष म्हणजे जॉर्ज फर्नांडिस स्वतःही त्या आंदोलनाचं नेतृत्व करायचे. दादर स्थानकात रेल्वे रुळांवर उतरलेल्या जॉर्ज यांच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी एकदा लाठीचार्ज केला होता. परंतु जॉर्ज यांच्याबरोबर असलेले कामगार आणि सहकारी पोलिसांच्या लाठ्याकाठ्यांना कधीही घाबरले नाहीत. त्यामुळे कार्यकर्तेही जोशात असायचे. पुढे जॉर्ज यांनी बिहारमध्ये बस्तान बसवलं आणि त्याच काळात शिवसेनेचा उदय झाला.  शिवसेनेची राडा संस्कृती मराठी वस्त्यांतील बेकार तरुणांमध्ये लोकप्रिय होत होती. गिरणगावातील कम्युनिस्टांचे गड सेनेने राडे करून मोडून काढले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावर हे तरुण आक्रमक होत हल्लाबोल करायला तयारच असायचे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई बंदचा इशारा दिला की मुंबई ठप्प होत असे.जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार, रवी रे यांच्यासारख्या नेत्यांना एकत्र करत समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. 1996च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पुढे 1998 आणि 1999च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. 1999च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला. 1998मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले. 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिस