शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील वकिलाचं दातृत्व; गावी परतताना मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबांना २५ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:55 IST

सुप्रीम कोर्टात जमा केलेल्या २५ लाखांचे होणार वाटप

नवी दिल्ली : मुंबईत अँटॉप हिल येथील दोस्ती एकर्स गृहसंकुलात राहणारे एक वकील अ‍ॅड. साघीर अहमद खान यांनी न्यायालयात जमा केलेली २५ लाख रुपयांची रक्कम, त्यांच्या इच्छेनुसार, परराज्यातून उत्तर प्रदेशात घरी परत जात असताना अपघातात मरण पावलेल्या पाच स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांना भरपाई म्हणून वाटण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.स्वत: अ‍ॅड. साघीर अहमद खान उत्तर प्रदेशातून मुंबईत स्थलांतरित झालेले आहेत. खास करून उत्तर प्रदेशच्या बस्ती, संत कबीरनगर यासारख्या जिल्ह्यांमधील महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना घरी परत जाण्याची सोय केली जावी यासाठी त्यांनी १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. लगेच दुसऱ्या दिवशी न्यायालयाने उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या याचिकेतील दोन प्रतिवादी राज्य सरकारांना नोटीस काढली.त्यानंतर ४ जून रोजी याचिका पुन्हा सुनावणीस आली तेव्हा अ‍ॅड. खान यांनी या स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकिटांसाठी २५ लाख रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली. न्यायालयाने त्यास संमती दिली व त्यानुसार अ‍ॅड. खान यांनी रक्कम न्यायालयात जमा केली.काय निर्देश?अ‍ॅड. खान यांनी या दिवंगत मजुरांचा तपशील सादर केल्यावर न्यायालयाच्या रजिस्ट्रीने तो संबंधित जिल्ह्यांच्या विधि सेवा प्राधिकरणाकडे शहानिशा करण्यासाठी पाठवावा. रजिस्ट्रीने रक्कम जिल्हा विधि सेवा प्राधिकरणांकडे वर्ग करावी व त्यांनी त्या रकमेचे मृृत स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांना वाटप करावे.न्या. अशोक भूषण, न्या. संसजय कृष्ण कौल व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी याचिका पुन्हा सुनावणीस आली तेव्हा अ‍ॅड. खान यांनी विनंती केली.दरम्यानच्या काळात बहुतांश स्थलांतरित मजुरांची त्यांच्या घरी रवानगी झालेली असल्याने आपण न्यायालयात जमा केलेली रक्कम घरी परतत असताना अपघातात मरण पावलेल्या पाच दुर्दैवी स्थलांतरित मजुरांच्या कुटुबांना भरपाई म्हणून वाटण्यात यावी.यासाठी अ‍ॅड. खान यांनी अशा पाच दिवंगत स्थलांतरित मजुरांची नावेही सुचविली व त्यांच्या तपशील एका आठवड्यात सादर करण्याची हमी दिली.