शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशांचा वापर रोखण्यास कायदे अपुरे- मुख्य निवडणूक आयुक्त रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 01:32 IST

निवडणुकांतील काळ्या पैशांचा वापर रोखण्यास सध्याचे कायदे अपुरे आहेत, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी केले आहे.

नवी दिल्ली : निवडणुकांतील काळ्या पैशांचा वापर रोखण्यास सध्याचे कायदे अपुरे आहेत, असे प्रतिपादन मुख्य निवडणूकआयुक्त ओ. पी. रावत यांनी केले आहे. केंब्रिज अ‍ॅनालिटिकासारखी डाटा चोरी, डाटा वापर आणि खोट्या बातम्या यांचा देशाच्या निवडणूक प्रक्रियेला गंभीर धोका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.‘भारतीय निवडणूक लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात रावत यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, केवळ लहरीपणावर लोकशाही चालत नाही. धैर्य, चारित्र्य, सचोटी आणि ज्ञान यासारख्या सद्गुणांची त्यासाठी आवश्यकता आहे. दुर्दैवाने हे गुण आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रावत यांनी सांगितले की, स्वच्छ निवडणुका या नेतृत्व आणि लोकांसाठी निर्मळ झऱ्यासारख्या असतात. हा झरा निवडणुकांना वैधता प्राप्त करून देतो. तोच प्रदूषित झाल्यास सामान्य माणूस संपूर्ण व्यवस्थेलाच दूषणे देऊ लागतो. ही चिंतेची बाब आहे. खोट्या बातम्या, यंत्रांद्वारे डाटा चोरी, डाटा वापर, व्यक्तिचित्रण, लक्ष्य करून होणारा संपर्क यामुळे जनमतावर परिणाम होत आहे. जनमत निर्माण करणे, योग्य निर्णय घेणे आणि प्रातिनिधिक सरकारची निवड करणे, यावर त्यांचा परिणाम होऊ शकतो. हाच आजच्या जगातील प्रत्येक लोकशाहीसमोर मोठा धोका आहे.मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले की, या समस्यांची निवडणूक आयोगाला जाण आहे. पैशांचा गैरवापर हा भारतीय निवडणुकांसमोरील चिंतेचा मुख्य मुद्दा आहे. पैशांचा गैरवापर थांबविण्यासाठी निवडणुकांचा खर्च सरकारने करावा, असा एक पर्याय सुचविला जातो. तथापि, सद्य:स्थितीत ते शक्य नाही. पैशांचा गैरवापर रोखण्यास सध्याचे कायदे समर्थ नाहीत. त्यामुळे आयोगाने यात अनेक सुधारणा सुचविल्या आहेत.माध्यम व्यवस्थापन हे सर्वांत मोठे आव्हानरावत यांनी म्हटले की, निवडणुकांसाठी माध्यम व्यवस्थापन हे सगळ्यांत मोठे आव्हान आहे. समाजमाध्यमेही त्यात आली. खोट्या बातम्या (फेक न्यूज) व देय बातम्या (पेड न्यूज) या समस्या आहेत. मुद्रित माध्यमांची भूमिका आता फारच मर्यादित झाली आहे. त्यामुळे माध्यम स्वातंत्र्याचा एकत्रित विचार न करता, सुटासुटा विचार केल्यास यावर मार्ग सापडेल.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीElectionनिवडणूकcommissionerआयुक्त