शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांकडून ५ राज्यांत ‘विकसित भारत’चा प्रारंभ; ‘मोदी की गॅरंटीवाली गाडी’ करणार वंचितांची नोंदणी, तक्रारकर्त्यांना मिळते त्वरित मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 07:43 IST

योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या महत्त्वाकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रेकडे वळले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांमध्ये यात्रेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लोकांशी संवाद साधला. 

योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचतो की नाही, हे पाहण्यासाठी आणि जे वंचित आहेत, त्यांची नोंदणी करण्यासाठी ही यात्रा म्हणजे भारत सरकारचा आजवरचा सर्वांत मोठा उपक्रम आहे. पंतप्रधानांनी या बसेसला-मोदी की गॅरंटीवाली गाडी-असे म्हटले आहे. 

या बसेसमध्ये (रथ) डिजिटल उपकरणे बसविलेली आहेत. ज्यांची तक्रार असेल त्यांना त्वरित मदत मिळते. केंद्राचे वरिष्ठ अधिकरी आणि इतर या रथाचा महत्त्वाचा भाग आहेत.एका महिन्याच्या कालावधीत ही यात्रा ६८,२६७ ग्रामपंचायतींमधील २.५४ कोटी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तेथे केंद्र सरकारच्या योजनांच्या २ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी-मेरी कहानी, मेरी जुबानी-या उपक्रमांतर्गत अनुभव कथन केलेले आहेत.

बसेसची संख्या वाढणार २५ जानेवारी २०२४पर्यंत देशभरातील ६.६४ लाख गावे आणि ४,००० पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पंतप्रधानांच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी १५०० बसेस आजवर कार्यरत होत्या.  आता ही संख्या १,७००वर गेली आहे आणि पुढील ७० दिवसांत ही संख्या २५००वर जाण्याची शक्यता आहे. विविध योजनांचा लाभ न मिळालेल्यांचीही नोंदणी यावेळी केली जाणार आहे.

५१ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी  आरोग्य शिबिरांमध्ये आजवर ५१ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, १० लाख आयुष्मान भारत हेल्थ कार्ड जारी करण्यात आले आहेत.  सात लाखांपेक्षा अधिक लोकांनी समाजासाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे आणि माय भारत व्हॉलिंटिअर या योजनेंतर्गत नोंदणी केलेली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी