शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लग्न उशिरा; तरीही लग्नानंतरच मुलींच्या जीवनमानात बदल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:09 IST

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो.

नवी दिल्ली :

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वूमेन अँड मेन इन इंडिया २०२२’ अहवालानुसार, महिलांचे लग्नाचे सरासरी वय वाढले आहे. हे वय २०१७ मध्ये २२.१ होते, ते वाढून २०२० मध्ये २२.७ झाले आहे. असे असूनही, महिलांची स्थिती अजूनही अनेक प्रकरणांमध्ये विवाहित जीवनावर अवलंबून असते. लग्नानंतर नोकरदार महिलांची संख्या कमी होऊ लागते.

 गाव आणि शहरात लग्नाच्या वयात फरक देशातील शहरी आणि ग्रामीण पातळीवर लग्नाच्या वेळी महिलांच्या सरासरी वयात अजूनही तफावत आहे. तीन वर्षांपूर्वी शहरांमध्ये २३.९ आणि गावांमध्ये २२.२ वर्षे वयात महिलांची लग्ने होत होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांचे विवाह करण्याचे वय सरासरी २६ वर्षे आहे. तर सर्वांत कमी वयात (२१ वर्षे) पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे मुलींचे लग्न केले जाते. २०२० मध्ये दिल्लीमध्ये लग्नाचे वय सरासरी २४.४ वर्षे, मध्य प्रदेशमध्ये २१.८ आणि छत्तीसगडमध्ये २१.६ वर्षे होते.

जबाबदारीचे ओझे...कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे विवाहित महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग मर्यादित आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, देशातील १५-४९ वयोगटातील केवळ ३२% स्त्रिया लग्नानंतर घराबाहेर काम करतात. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ९८ टक्के इतके आहे.

नोकरी नव्हे, लग्न हे स्थलांतराचे कारण१९८१ ते २०१७ पर्यंत देशात महिला साक्षरतेचे प्रमाण ४०.५ टक्क्यांनी वाढले आहे, तर पुरुषांच्या बाबतीत ही वाढ केवळ २८.३ % होती. असे असूनही, केवळ ०.६ % महिला शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जातात, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण ४.७% आहे. ‘भारतातील स्थलांतर २०२०-२१’ अहवालानुसार, केवळ ०.७% स्त्रिया नोकरी, चांगल्या संधी, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी जवळ असणे किंवा बदलीमुळे स्थलांतर करतात, तर ८६.८ टक्के महिला लग्नामुळे स्थलांतरित होतात.

 देशातील विवाहाच्या वेळी महिलांचे सरासरी वय