शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षी भारतावर ११.५८ लाख सायबर हल्ले, ३००% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:10 IST

cyber attacks on India: एका वर्षात या हल्ल्यांत सुमारे ३०० टक्के वाढ झाली. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : गेल्या वर्षी विघातक शक्तींनी विदेशातून भारतावर ११.५८ लाख सायबर हल्ले चढविले आहेत. २०१९ साली ही संख्या ३.९४ लाख होती. म्हणजे एका वर्षात या हल्ल्यांत सुमारे ३०० टक्के वाढ झाली. सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

हल्ले रोखण्यास यंत्रणा सज्जसायबर हल्ल्यांपासून सुरक्षित कसे राहावे याचा आजवर ५९ वेळा केंद्राने सराव केला. त्यात देशातील ५६५ संस्था सहभागी झाल्या होत्या. केंद्राने राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची (एनसीसीसी) स्थापना केली आहे. हल्ले टाळण्यासाठी संबंधित सरकारी  खाती, संस्थांना एनसीसीसीकडून सूचना दिल्या जातात. 

विदेशातून सहा लाख हल्ले - सायबर हल्ले रोखण्याचे काम इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीममधील (सीईआरटी-इन) तज्ज्ञ मंडळी करतात. यंदाच्या वर्षी जून अखेरपर्यंत भारतावर विदेशातून सहा लाख सायबर हल्ले झाले आहेत. - सायबर हल्ल्यांचा धोका असलेल्या देशातील ७०० संस्था, यंत्रणा, उद्योगांना सीईआरटी-इनच्या तज्ज्ञांनी याआधीच सावध केले आहे. - हे हल्ले परतवण्यासाठी असलेली यंत्रणा अद्ययावत करा, अशी सूचना दिली आहे. हल्ले रोखण्यासाठी सरकारनेही पूर्वतयारी केली आहे. - केंद्रातील विविध खाती, राज्य सरकारांचे विविध विभाग, त्यांच्या संस्था, यंत्रणा, त्यांच्या वेबसाइट, तसेच ऑनलाइन व्यवहाराच्या यंत्रणा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.   

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारत