नवी दिल्ली : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल एम.एन. राय यांच्या पार्थिवावर गुरुवारी संपूर्ण लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करप्रमुख दलबीरसिंग यांनी येथील छावणीत शेकडो लोकांच्या उपस्थितीत देशाच्या या शूरवीरास पुष्पांजली वाहिली. ३९ वर्षीय राय यांना बंदुकांचीही सलामी देण्यात आली. त्यांच्या पार्थिवास त्यांचे ज्येष्ठ बंधू कर्नल डी. एन. राय यांनी मुखाग्नी दिला. तेसुद्धा गोरखा रायफल्समध्ये आहेत.
कर्नल राय यांना अखेरचा निरोप
By admin | Updated: January 30, 2015 05:59 IST