शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:04 IST

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे

नवी दिल्ली, दि. 31 - आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसं न केल्यास पॅन कार्ड रद्द होण्याची भीती होती. मात्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ देत दिलासा दिला आहे. याआधी सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ देत ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली होती. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलं नाही तर पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे नवीन पॅन कार्ड बनवावे लागू शकते. यासोबतच जर तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही.

SMS वर लिंक करा आधार आणि पॅन कार्डविवरणपत्र भरण्याची प्रक्रिया जास्त सोपी होण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड क्रमांकांची जोडणी उपयुक्त होणार आहे. पॅनकार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करायला दोन्ही कार्डांवरील नावं सारखी असणं आवश्यक आहे. दोन्ही कार्ड जोडण्यासाठी नागरीकांनी  567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. याशिवाय नागरीकांना ऑनलाईनही आपल्या कागदपत्रांची जोडणी करुन घेता येणार आहे. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवरील लिंकवरुनही हे काम करता येणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आली होती.  पॅननंतर सरकारनं आधार कार्डवर कात्री लावली होती. नियमानुसार देशातील नागरिक एकच आधार कार्ड वापरू बनवू शकतो.  आतापर्यंत 111 कोटी भारतीयांनी आधार कार्ड काढले आहे. सरकारी योजनांसाठी आजघडीला आधारचा दहा आकडी यूनिक आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे.  

गेल्या काही दिवसांत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याला माहित असायला हवे की, आपले आधार कार्ड रद्द झाले नाही ना. 

कशी तपासणार आधार कार्डची वैधता ? आधार रद्द केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना चुकून स्वतःचे आधारकार्ड रद्द झालेले नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. मात्र टेन्शन घेऊ नका. आधार कार्ड रद्द झाले आहे की नाही? हे अगदी काही वेळेतच तुम्ही ऑनलाइन तपासून पाहू शकता. \- आधार नंबर अॅक्टिव्ह आहे की नाही, हे पाहण्यासाठी काही स्टेप्स. सर्वप्रथम UIDAIच्या संकेतस्थळावर जा. https://uidai.gov.in/ ही आहे लिंक.- ही लिंक तुम्हाला नव्या पेजवर घेऊन जाईल. ओपन झालेल्या पेजवर आधार कार्ड नंबरची माहिती मागितली जाईल. आधार कार्डनंबर टाका. तुम्ही एक सुरक्षित कोड टाका आणि व्हेरीफायवर क्लिक करा.- Verify वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. येथे लिहीलेला आधार नंबर ****** Exists. त्यानंतर त्याच्या खाली तुमचे वय आणि तुमचा मोबाईल नंबरची माहिती असेल. हे सर्व तुम्ही लिहिले असेल तर तुमचे आधार कार्ड अधिकृत असेल आणि ते रद्द झालेले नसेल.- यानंतर ओपन होणा-या पुढील विंडोमध्ये तुम्हाला तुमचे पॅन कार्ड रद्द केले आहे की केलेले नाही, याची माहिती उपलब्ध होईल.