शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 09:05 IST

लष्कर-ए-तोयब्बाचा म्होरक्या,  26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे.

नवी दिल्ली- लष्कर-ए-तोयब्बाचा म्होरक्या,  26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. काश्मिरी व्यावयासिक जहूर अहमद शाह वटाली याच्या नावे ही मालमत्ता असून, त्या बंगल्याची किंमत अंदाजे 1 कोटींहून अधिक आहे. उद्योजक जहूर अहमद शाह वटाली हा लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदच्या पैशांचे सर्व व्यवहार सांभाळतो. काश्मिरी व्यावयासिक जहूर अहमद शाह वटालीची ही मालमत्ता गुरुग्राममध्ये आहे. या मालमत्तेची किंमत 1 कोटी तीन लाख रुपये सांगितली जात आहे.एनआयएनं दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात 2017मध्ये वटालीसह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे.  ईडीच्या माहितीनुसार, या बंगल्याच्या खरेदीसाठी फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेचा पैसा वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पैसा संयुक्त अरब अमिरातीतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासात उघड झालं आहे.हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करून वटालीकरवी भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडी जमा करत आहे. 

टॅग्स :hafiz saedहाफीज सईद26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा