शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शतकातील सर्वांत मोठे चंद्रग्रहण आज पाहता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:41 IST

सावल्यांचा रंगणार खेळ; रात्री पावणेअकरा वाजता ग्रहणाला सुरुवात

पुणे : देशातील सर्व खगोलप्रेमी याबरोबरच नागरिकांना आज शतकातील सर्वांत मोठे खग्रास चंद्रग्रहण (२७ जुलै) पाहता येणार आहे. १ तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून, शुक्रवारी रात्री १०.४५ मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार आहे. मात्र, आपल्याकडील गेल्या काही दिवसांपासूनच्या पावसाळी व ढगाळ वातावरणाचा अडथळा दूर झाल्यास हे ग्रहण पाहता येणार आहे. ग्रहण कालावधी चार तास (तीन तास पंचावन्न मिनिटे) असल्याने हे सर्वांत मोठ्या कालावधीचे ठरणार आहे.पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. यानंतर पुन्हा ९ जून २१२३ मध्ये असे ग्रहण अनुभवयास मिळेल. जुलै महिन्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छोटा आकार, त्याचा मंदावलेला वेग आणि पृथ्वीची मोठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण होते. आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे.ग्रहणाविषयी अधिक माहिती देताना खगोलशास्त्रज्ञ प्रकाश तुपे म्हणाले, शुक्रवारी रात्री १0.४५ वाजता हे ग्रहण सुरू होईल. या वेळी चंद्र पृथ्वीच्या छायेत शिरेल. ११.५४ वाजता चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश करेल. त्यापुढे रात्री १ वाजता चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत शिरलेला असेल. २.४३ मिनिटांनी दाट छायेतून तो बाहेर पडेल. ४.५९ मिनिटांनी तो पूर्णपणे पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडलेला असले. हे संपूर्ण चार तासांचे ग्रहण असेल. पृथ्वीच्या सभोवतालचे वातावरण योग्य असेल तर या ग्रहणाच्या काळात चंद्र हा तांबूस रंगाचा दिसेल. तर वातावरण दूषित असले तर चंद्र हा काळवंडलेला पाहायला मिळेल. हे ग्रहण कोणालाही पाहता येणे शक्य आहे. या ग्रहणाचे कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. या शतकातील हे मोठे ग्रहण असल्याने विद्यार्थी, खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंनी हे ग्रहण पाहण्याची संधी सोडू नये.२७ जुलै २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण हे ‘सारोस’ चक्रातील १२९ वे ग्रहण आहे. या आधीचे सर्वांत मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० या दिवशी झाले होते. योगायोग म्हणजे दोन्हीही ग्रहणे एकाच सारोस चक्रातील आहेत. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातील जवळपास सर्वच खंडांतून (युरोप, आफ्रिका, आशिया, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण अमेरिका) हे ग्रहण पाहायला मिळणार आहे. संपूर्ण भारतातून ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र