शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘चांद्रयान-२’चे लॅँडिंग अवघ्या काही दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 05:46 IST

चंद्रावर उतरण्याआधीचा महत्त्वाचा टप्पा यशस्वी : लॅँडरच्या विलगीकरणाची कामगिरी फते

बंगळुरु : महिनाभरापूर्वी श्रीहरीकोटा येथून अंतराळात भरारी घेऊन चंद्राच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘चांद्रयान-२’मधील प्रत्यक्ष चंद्रावर उतरवायची ‘विक्रम’ (लॅण्डर) आणि ‘प्रज्ञान’ (रोव्हर) ही दोन उपकरणे मुख्य यानापासून अचूकपणे विलग करण्याची कामगिरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी सोमवारी फत्ते केली. यामुळे ‘विक्रम’ व ‘प्रज्ञान’च्या अवघड चांद्रवारीतील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला.

अंतराळात सोडलेल्या मूळ यानाचा ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ असलेला भाग गेले काही दिवस चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत होता. या तिन्हींची बांधणी एकत्रित होती. यापैकी ‘आॅर्बिटर’ पुढील चार वर्षे चंद्राभोवती घिरट्या घालणार आहे व ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ चंद्रावर उतरवायचे आहेत. त्यासाठी पुढील स्वतंत्र प्रवासासाठी या दोन उपकरणांना ‘आॅर्बिटर’पासून विलग करणे हा एक महत्त्वाचा टप्पा होता. ‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार या विलगीकरणासाठीची सर्व स्वचलित यंत्रणा बसविण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे कामे पार पाडण्याची ‘कमांड’ भूनियंत्रण केंद्राकडून दिली गेल्यावर ही स्वचलित यंत्रणा कार्यान्वित झाली व सोमवारी दु. १.१५ वाजता ‘आॅर्बिटर’पासून ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ अचूकपणे विलग झाले. विलगीकरणानंतर या दोन्ही उपकरणांमधील सर्व यंत्रणा पूर्णपणे ठाकठीक आहेत, असेही ‘इस्रो’ने नमूद केले.ही दोन्ही उपकरणे येत्या ५ सप्टेंबर रोजी पहाटे १.५५ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात अलगदपणे उतरविली जायची आहेत. चंद्रावर उतरणे सुरु करण्याआधी त्यांना चंद्राच्या ३६ बाय १०० किमीच्या सुयोग्य कक्षेत आणावे लागेल. त्यासाठी मंगळवारी व बुधवारी कक्षा सुधारण्याची दोन कामे केली जातील.चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावणाऱ्या ‘लॅण्डर’चा वेग हळूहळू नियंत्रित करणे व आतील अत्यंत नाजूक यंत्रणांचे कोणतेही नुकसान न होता अखेरीस ते चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशातील खोल विवरांच्या भागात चारही पायांवर तोल सांभाळून नीट उभे राहील, अशा पद्धतीने अलगद उतरविणे ही पुढील कामे थरारक आव्हानाची आहेत. पुढील तीन दिवस असेच यश मिळत गेले तर चंद्रावर यान अलगद उतरविण्याचे कौशल्य मिळविणारा अमेरिका, रशिया व चीन यांच्यानंतर भारत जगातील चौथा देश ठरेल.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो