शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद सोडून लष्करात दाखल झालेला लान्स नायक नझीर वानी चकमकीत शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 17:02 IST

सध्या काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून जोरदार कारवाई सुरू आहे.

श्रीनगर - सध्या काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे 20 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे. या चकमकीदरम्यान भारतीय लष्करामधील काही जवानांनाही वीरमरण आले.  या शहीद झालेल्या जवानांपैकी एक नाव आहे लान्स नायक नझीर अहमद वानी. नझीरने एकेकाळी दहशतवाद्यांसोबत बंदूक उचलली होती. त्यानंतर आत्मसमर्पण करून तो लष्करात दाखल झाला होता. लष्करी सेवेदरम्यान दाखवलेल्या शौर्यासाठी 2007 साली त्याला सेना मेडलही प्रदान करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार नझीर वानी हा काश्मीरमधील कुलगाम येथील अश्मुजी गावातील रहिवासी होता. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्हा दहशतवाद्यांच्या गड मानला जातो. दरम्यान,  लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की लान्स नायक नझीर अहमद वानी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. 

नझीर वानी यांनी 2004 साली टेरिटोरियल आर्मीमधून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. दरम्यान, सोमवारी त्यांना सुपुर्द ए खाक करण्यापूर्वी 21 तोफांची सलामी दिली गेली. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील करपान भागात असलेल्या हिपुरा बाटागुंड गावात झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.  

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करJammu Kashmirजम्मू-काश्मीर