शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

‘बीजेपी भगाओ’साठी उसळली गर्दी, नितीशकुमार यांना केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 02:12 IST

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला रविवारी मोठी गर्दी उसळली होती.

पाटणा, दि. 27 : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला रविवारी मोठी गर्दी उसळली होती. संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आदींनी या रॅलीला हजेरी लावली.

राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा पराभव करु आणि त्यासाठी विरोधकांच्या एकीचे दर्शन या रॅलीतून दिसेल. जदयूचे बंडखोर नेते शरद यादव यांचे लालूप्रसाद यादव यांनी व्यासपीठावर गळाभेट घेऊन स्वागत केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करुन शरद यादव या रॅलीत सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. जदयूचे राज्यसभा सदस्य अली अनवर हेही या रॅलीला उपस्थित होते. जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी शरद यादव यांना पाठविलेल्या पत्रात रॅलीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शरद यादव यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्यास असे समजण्यात येईल की, त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार पक्ष सोडला आहे.तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे स्वागत राबडी देवी यांनी केले. व्यासपीठावर भाकपचे महासचिव एस. सुधाकर रेड्डी आणि सचिव डी. राजा यांची उपस्थिती होती. झामुमोचे प्रमुख आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झाविमोचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी, राष्ट्रवादीचे नेते व संसद सदस्य तारिक अन्वर यांचीही उपस्थिती होती.  या वेळी रघुवंश प्रसाद सिंह, अब्दुल बारी सिद्दीकी, शिवानंद तिवारी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी महाआघाडी तोडल्याबद्दल नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तर तेजस्वी यादव हे बिहारचे भावी नेते आहेत, असे गौरवोद्गार काढले. अखिलेश यादव, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यांनी व्यासपीठावरुन हात उंचावून एकतेचा संदेश दिला.शरद यादव यांना अपात्र ठरवाजदयूचे बंडखोर नेते शरद यादव यांना राज्यसभेसाठी अपात्र ठरवा, अशा मागणीचा अर्ज जदयूच्या वतीने राज्यसभा सभापती वेंकय्या नायडू यांना करण्यात येणार आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवSonia Gandhiसोनिया गांधीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस