शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:37 IST

Tej Pratap Yadav Health Update: हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून उपचार

Tej Pratap Yadav Health Update: राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आणि जनता दल (जनशक्ती पक्ष) अध्यक्ष तेज प्रताप यादव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाटणा येथील कंकरबाग येथील मेडिव्हर्सल हॉस्पिटलच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या विशेष पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले.

रुग्णालयात दोन तास तपासणी

मिळालेल्या वृत्तानुसार, तेज प्रताप यादव यांनी असह्य पोटदुखीची तक्रार केली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते स्वतःहून रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी लगेच त्यांची तपासणी सुरू केली. त्यांची वैद्यकीय तपासणी आणि अल्ट्रासाऊंड चाचणी केली. सुमारे दोन तास चाललेल्या सखोल वैद्यकीय तपासणीनंतर त्यांचे सर्व अहवाल आले. काळजीचे कसलेही कारण नाही असे अहवालात स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, तेजप्रताप यांच्या ओळखीच्या एका रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते एक दिवस आधी मंगळवारी रात्रीही त्याच रुग्णालयात गेले होते.

दरम्यान, उपचारानंतर तेज प्रताप रुग्णालयातून बाहेर आले. वाढत्या थंडीमुळे त्यांनी डोक्यावर जाड मफलर आणि शरीरावर लोकरीची शाल गुंडाळल्याचे दिसले. डॉक्टरांनी त्यांना आवश्यक औषधे दिली आहेत आणि आहारात पथ्ये पाळण्यास आणि थंडीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला आणि हसत हसत म्हणाले की, येणारे २०२६ हे वर्ष सर्वांसाठी मंगलमय जावो. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि बिहारमधील सर्व लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Lalu Yadav's son, Tej Pratap Yadav, hospitalized after sudden illness.

Web Summary : Tej Pratap Yadav was hospitalized in Patna due to stomach pain. After tests, doctors found no serious issues and advised rest, diet, and protection from the cold. He's now stable and resting at home, wishing everyone well for 2026.
टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार