शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लालू यादवांनी पक्षात केले मोठे बदल!कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:21 IST

पाटण्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या आरजेडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भोला यादव यांनी हा प्रस्ताव मांडला. लालूप्रसाद यांच्या निर्देशानुसार मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून तेजस्वी यादव यांची निवड झाली आहे. आज पाटणा येथे राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यासह पक्षाचे जवळजवळ सर्व मोठे नेते उपस्थित होते. बैठकीदरम्यान, राजदचे बिहार प्रदेश अध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी याची घोषणा केली. पाटणा येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या राजद राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भोला यादव यांनी हा प्रस्ताव मांडला. लालू प्रसाद यांच्या सूचनेनुसार मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाला कार्यकारी सदस्यांनी हात वर करून पाठिंबा दिला. लालू प्रसाद यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाने पहिल्यांदाच कार्यवाहक अध्यक्ष निवडला आहे. तेजस्वी यांना अध्यक्षाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत.

आईच्या कुशीतून २० दिवसांच्या बाळाला माकडाने पळवलं, विहिरीत फेकलं; 'असा' झाला चमत्कार

राजद नेत्याने सांगितले की, बैठकीत उपस्थित असलेल्या जवळजवळ सर्व नेत्यांनी तेजस्वी यादव यांना जबाबदारी देण्याची मागणी केली. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की तेजस्वी यादव हे आता बिहार आणि राजदचे भविष्य आहेत. त्यानंतर तेजस्वी यादव यांची पक्षाचे नवे कार्यकारी प्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली. लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना प्रमाणपत्र दिले. राजदने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करून तेजस्वी यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची बातमी शेअर केली. ही राजदमधील एका नवीन युगाची सुरुवात असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले.

गेल्या वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, राष्ट्रीय जनता दलाने (RJD) त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला, तिथे "नेतृत्व संबंधीत महत्वाचा निर्णय" घेतले जातील अशी अपेक्षा होती. त्यानंतर, तेजस्वी यादव यांची पक्षाचे नवे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९९७ मध्ये जनता दलातून फुटल्यानंतर राजदची स्थापना करणारे लालू प्रसाद यादव पक्षाच्या स्थापनेपासूनच सर्वोच्च पदावर आहेत.

या महत्त्वाच्या आरजेडी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी २० हून अधिक राज्यांतील प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शनिवारी पाटणा येथे उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lalu Yadav's RJD: Tejashwi Yadav Appointed as Executive President

Web Summary : Tejashwi Yadav is RJD's new executive president, succeeding Lalu Yadav due to health concerns. The decision was made at a key party meeting in Patna, marking a new era for the party. All leaders supported the decision.
टॅग्स :Biharबिहार