बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित एक प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. चारा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात लालू यादव यांना दिलेला जामीन रद्द करण्याची विनंती केली आहे. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे.
भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस तयार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन
सीबीआयने या प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली असून लालू यादव यांचा जामीन रद्द करण्यास सांगितले आहे. SC आता या प्रकरणी २५ ऑगस्टला सुनावणी करणार आहे. देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी सर्व पक्षीय करत आहेत आणि लालू प्रसाद यादव हे विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीसाठी महत्त्वाचा दुवा बनत आहेत. विरोधी पक्षांची पहिलीच बैठक बिहारमध्ये झाली होती.
चारा घोटाळ्यांसारखेच आणखी चार प्रकरणं आहेत. यामध्ये लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सीबीआयने त्यांच्याविरुद्धच अपील केले आहे. याशिवाय सीबीआयने लँड फॉर जॉब घोटाळ्यात लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.