शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लालू प्रसाद यादव गमावणार 128 कोटींची मालमत्ता; IT ने दिला 'जोर का झटका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 12:49 IST

चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पाटणा - चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण लालू प्रसाद यादव आणि कुटुंबियांच्या नावे पाटणा आणि दिल्लीतील अलिशान परिसरात असलेली मालमत्ता लवकरच जप्त होण्याची शक्यता आहे. नवीन बेनाम संपत्तीच्या कायद्याअंतर्गत मालमत्तेसंदर्भात लालूंना आयकर विभागाने नोटीस दिली आहे. लालूंची तब्बल 128 कोटींची मालमत्ता असून ती लवकरच जप्त होण्याची चिन्ह दिसत आहेत.

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना शेल कंपन्यांच्या मार्फत त्यांच्या नातेवाइकांनी ही मालमत्ता अत्यंत कमी किमतीत खरेदी केली होती. त्यानंतर ही मालमत्ता लालू प्रसाद यादव यांनी त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलांच्या नावावर करून घेतली होती. आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लालूंच्या या मालमत्तेची एकूम किंमत ही तब्बल 127.75 कोटी आहे. या मालमत्तेत पाटण्यात तयार होत असलेला एक मॉल, दिल्लीतील आलिशान बंगला आणि दिल्ली एअरपोर्ट जवळचे एक शेत इतक्या गोष्टींचा समावेश आहे. 

बेनाम संपत्तीच्या कायद्याअंतर्गत लालू प्रसाद यादव दोषी आढळल्यास त्यांना 7 वर्षाचा तुरुंगवास आणि मालमत्तेच्या बाजारभावानुसार असलेल्या एकूण किंमतीच्या 25 टक्के हिस्सा दंड म्हणून भरावा लागेल. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं आहे. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवdelhiदिल्ली