शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पराभवाच्या धक्क्यामुळे लालूप्रसाद यांचा भोजनत्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:44 IST

रांची येथील रुग्णालयात दाखल असलेले लालूप्रसाद यादव लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून अस्वस्थ असून, त्यांनी दोन दिवस दुपारचे जेवणही घेतले नाही.

पाटणा : रांची येथील रुग्णालयात दाखल असलेले लालूप्रसाद यादव लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून अस्वस्थ असून, त्यांनी दोन दिवस दुपारचे जेवणही घेतले नाही. त्यामुळे डॉक्टर मंडळी चिंताग्रस्त आहेत. चारा घोटाळ्याबद्दल राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद याव यांना शिक्षा झाली आहे.बिहार आणि झारखंडमध्ये राजदचा दारुण पराभव झाला. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लालूप्रसाद यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. हे समजताच डॉ. उमेश प्रसाद व डॉ. डी. के. झा यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला. तो सामान्य होता. रक्तातील साखरेचे प्रमाण काहीसे वाढले होते. रक्तदाब, मधुमेहआणि मूत्रपिंडाच्या विकारामुळे आजारी असलेल्या लालूप्रसाद यांच्यावर रांची येथील रुग्णालयात डिसेंबर २०१७ पासून उपचार सुरू आहेत.नेहमी हसतमुख असलेले लालू त्यांच्या विनोदांबद्दल चांगलेच प्रसिद्ध आहेत. एकेकाळी त्यांचे साम्राज्य असलेल्या बिहार आणि शेजारील झारखंडमध्ये त्यांच्या पक्षाचे नावही राहिलेले नाही. राष्ट्रीय जनता दलाला १९९७ नंतर प्रथमच बिहारमध्ये एकही जागा मिळू शकलेली नाही. झारखंडमध्ये पक्षाला सलग दुसऱ्यांदा खाते उघडता आलेले नाही. महाआघाडीतर्फे राजदने १९ जागा लढविल्या होत्या. लालूंच्या कन्या मिसा भारती यांचाही पाटलीपुत्र मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.सारण मतदारसंघातही लालू यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय हेही पराभूत झाले. बिहारमधील ४० मतदारसंघांपैकी केवळ किशनगंजमध्ये महाआघाडीतील कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला. (वृत्तसंस्था)>लालूप्रसाद नसल्याने फटकाराजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, काय चुकले आहे, यावर सविस्तर विचारमंथन केले जाईल. मात्र लालूप्रसाद यांच्या अनुपस्थितीचा मोठा फटका पक्षाला बसला आहे. पक्षाला पराभवातून धडा मिळाला. मात्र पक्षनेतृत्व पक्षाची पूर्वीची ताकद मिळविण्यासाठी विचार करेल.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव