शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

Lalu Prasad Yadav: तेजस्वी की तेजप्रताप? लालू प्रसादांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:56 IST

Tejaswi Or Tejpratap Yadav? मी माझ्या सत्ताकाळात 15वर्षे स्थिर सरकार दिले. गरिबांना त्यांचा हक्क दिला, असे सांगत लालू यांनी नितिशकुमार यांच्यावर तोंडसुख घेतले.

पाटणा : राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे. बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लालू पूत्रांमध्ये वाद असल्यावरून खळबळ उडाली होती. तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव (Tejpratap Yadav) यांचे समर्थक वेगळे झाल्याने राजद फुटीच्या उंबरठ्यावर होता. दोघांचेही समर्थक एकमेकांचे पोस्टर काढून त्या जागी आपल्या नेत्यांचे पोस्टर लावत होते. आता लालू यांनीच वारसदार कोण असेल ते स्पष्ट केल्याने कार्यकर्त्यांची फरफट थांबण्याची शक्यता आहे. 

तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) हाच आपला उत्तराधिकारी असेल असे लालू यांनी आज स्पष्ट केले. सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. दोन्ही भाऊ चांगले चालले आहेत. ते एकत्रच आहेत, असे सांगत लालू यांनी नितिशकुमार यांच्यावर तोंडसुख घेतले. विसर्जन म्हणजे गोळी मारणे असा होत नाही असे ते म्हणाले. तसेच त्यांना आम्ही गोळी का मारू, ते स्वत:च संपवून घेत असतील तर असे ते म्हणाले. भकचोन्हर म्हणजे असमजूतदार, मूर्ख असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे काही अपमान वगैरे होत नाही. ही काही शिवी नाहीय, हवेतर डिक्शनरी वाचा, असे लालू म्हणाले. 

लालू म्हणाले की, मी माझ्या सत्ताकाळात 15वर्षे स्थिर सरकार दिले. गरिबांना त्यांचा हक्क दिला. बिहारमध्ये राजदमध्ये आपला उत्तराधिकारी हा तेजस्वीच असेल, असे लालू यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. तेजप्रतापला भाजपाचे लोक फितवत आहेत. अशाप्रकारे चर्चा घडवून आणत पिता-पुत्रांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लालू यांनी केला. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार