शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

"पुढच्या वेळी ते बिहारशी बालपणाचे नाते सांगतील"; मखाना खाण्यावरुन लालूंनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मखानावरील विधानावरुन लालू प्रसाद यादव यांनी टीका केली आहे.

Lalu Prasad Yadav Jibe On PM Narendra Modi: बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीला सात महिन्यांचा अवधी असताना तिथल्या राजकारणात हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या आमदारांना स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपण वर्षातील ३६५ दिवसांपैकी ते ३०० दिवस मखाना खात असल्याचे म्हटलं होतं. आता आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. पुढच्या वेळी पंतप्रधान मोदी ३५० दिवस बिहारी भुंजा खातील असं लालू प्रसाद यांनी म्हटलं.

बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी मखानाला सुपरफूड म्हटलं होतं. यावरुनच लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी आमच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी वर्षात फक्त ३०० दिवस मखना खाण्याबाबत सांगितले. पुढच्या वेळी ते ३५० दिवस ‘बिहारी भुंजा’ खाण्यावर आणि १०० दिवस भागलपुरी सिल्क घालण्यावर बोलतील असं लालू प्रसाद यादव म्हणाले.

लालू प्रसाद यादव यांनी 'एक्स'वर पोस्ट करत पंतप्रधान मोदीना टोला लगावला. "यावेळी आमच्या प्रश्नांवर पंतप्रधानांनी वर्षात फक्त ३०० दिवस मखना खाण्याबाबत सांगितले. पुढच्या वेळी ३५० दिवस “बिहारी भुंजा” खाण्यावर बोलतील. १०० दिवस भागलपुरी सिल्क घालतील. छठमैयाचा उपवास करतील. गंगेत स्नान करतील. जानकी मैय्याच्या मंदिरात जातील. बिहारशी बालपणाचे नाते जोडतील. मधुबनी चित्र काढलेले उपरणे किंवा कुर्ता घालतील. भोजपुरी, मगही, अंगिका, बज्जिका, सुरजापुरी आणि मैथिली भाषांमधून २-४ उधार घेतलेल्या ओळींनी भाषण सुरु करतील. जननायक कर्पूरी ठाकूर जी, लोकनायक जयप्रकाश जी आणि इतर महापुरुषांशी असलेल्या संबंधांबद्दल सांगतील," असा टोला लालू प्रसाद यादव यांनी लगावला.

दरम्यान, बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपूर जिल्ह्यातून देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा १९ वा हप्ता जारी केला होता. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात,"आज तुमचा मखाना देशातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मी देखील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस मखाना नक्कीच खातो. सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. आता बिहारच्या मखानाची वेळ आली आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहार