शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'; 15 लाख रुपयांवरून लालूंचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 18:58 IST

लालू म्हणाले, या देशात अल्पसंख्यक सुरक्षित नहीत. देशात गरिबी, महागाई वाढत आहे. आपण आज येथे एकत्रित आलो आहोत. सर्वांनाच माहीत असेल की, भाजप किती खोटं बोलून सत्तेवर आला.

INDIA आघाडीमध्ये सामील झालेल्या 28 विरोधी पक्षांचे नेते गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत एकत्र आले आहेत. येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठकिला संबोधित करताना आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. याच वेळी, सर्व पक्ष एकत्रित येत आहेत, याचा आनंद आहे. भाजपला हटवा देश वाचवा, ही लढाई आम्ही सुरुवातीपासूनच लढत आहोत, असेही लालू यादव यावेळी म्हणाले.

लालू म्हणाले, या देशात अल्पसंख्यक सुरक्षित नहीत. देशात गरिबी, महागाई वाढत आहे. आपण आज येथे एकत्रित आलो आहोत. सर्वांनाच माहीत असेल की, भाजप किती खोटं बोलून सत्तेवर आला.

मोदी म्हणाले होते, स्विस बँकेतील पैसा परत आणणार - भाजपने सत्तेवर येण्यासाठी आपलेही नाव घेतले होते. या लोकांचा पैसा स्वीस बँकेज जमा असल्याचे सांगितले होते. मोदी म्हणाले होते, स्वीस बँकेतला पैसा परत आणणार आणि लोकांना 15-15 लाख रुपये मिळतील.

'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'आपल्या खास अंदाजात निशाणा साधताना लालू म्हणारे, यासाठी मोदींनी लोकांचे जनधन खातेही उघडले होते. आम्ही पती-पत्नीनेही आपे खाते उघडले. पण पैसे आले नाही. काय मिळाले? हे आपल्यालाही माहीत आहे. खरे तर, तो याच लोकांचा पैसा होता. 

मोदी जींना सूर्यावर पाठवा : लालू यादव -यानंतर लालू म्हणाले, चंद्रयानासंदर्भात सध्या  बरीच चर्चा होत आहे. चंद्रयानाच्या यशावर आम्हा सर्वांनाच अभिमान आहे. पण, वैज्ञानिकांना विनंती करतो की, मोदी जींना सूर्यावर पाठवा. यासाठी आमच्या शुभेच्छाही आहेत. एवढेच नाही, तर देशात विरोधी पक्षांतील असा एकही नेता नाही, ज्याला तपास यंत्रनांचा सामना करावा लागला नाही, असेही लालू यावेळी म्हणाले.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबई