शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

श्रीरामांच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न; ऑक्टोबरपासून अयोध्या, पर्यटनाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 08:25 IST

येत्या काळातही देशात अध्यात्मिक पर्यटन वाढीचे संकेत दिसत आहेत.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असतानाच संपूर्ण देशभर उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. याचवेळी राम मंदिराशी संबंधित उद्योगाचे शेअर्स सोमवारीच नव्हे तर ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने तेजीत आहेत. बाजारावर नीट लक्ष ठेवून असलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये आपली गुंतवणूक वाढविली आहे. 

येत्या काळातही देशात अध्यात्मिक पर्यटन वाढीचे संकेत दिसत आहेत. सरकारने पर्यटनाला चालना दिल्याने जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा वाढू शकतो. येत्या काळात आयआरसीटीसी, इंडियन हॉटेल्स, थॉमस कुक, प्रावेग आणि इंटरग्लोब एव्हिएनशन या कंपन्यांचे शेअर्सवर गुंतवणूकदार आणखी पैसे गुंतवू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. देशातील मोठमोठ्या बांधकाम कंपन्यांनीही अयोध्येकडे मोेर्चा वळवल्याने शहराच्या विकासाला हातभार लागणार आहे. 

अलाइड डिजिटल सर्व्हिसेसया कंपनीला अयोध्येतील स्मार्ट सिटी प्रकल्पात एक कंत्राट मिळाले आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीत परदेशी संस्थात्मक गुंतणूकदारांची कसलाही हिस्सा नव्हता. डिसेंबर तिमाहीत हा हिस्सा एक टक्के झाला. 

इझी ट्रीप प्लानर्स प्रवासी सेवा पुरवणाऱ्या इझी ट्रीप प्लानर्स या कंपनीतील किरकोळ गुंवणूकदारांचा हिस्सा वाढला आहे. ऑक्टोबरपासून कंपनीचा शेअर १४ टक्क्यांनी वाढला आहे. महिनाभरात हा शेअर आणखी २० टक्क्यांनी वाढला आहे.

थॉमस कुक इंडिया प्रवासी सेवा देणाऱ्या थॉमस कुक इंडिया या कंपनीवरही किरकोळ गुंतवणूदारांनी विश्वास दाखवला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीतील ऑक्टोबरपासून कंपनीचा शेअरमध्ये ३५ टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे.

इंटरग्लोब एव्हिएशन देशातील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे संचालन करणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशन कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा वाढला आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या