शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

lakhimpur Kheri : इकडे महाराष्ट्रात बंद, दिल्लीत राहुल अन् प्रियंका गांधी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 21:04 IST

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.

ठळक मुद्देनाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस नेत्यांनी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले. यावेळप्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी मृत्यू प्रकरणाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तिकडे दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस नेत्यांनी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले. यावेळप्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी भाजपाला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून भाजपाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. त्यांच्या मंत्र्यांचा मुलगा गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारतो तरीही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचे ह्रदय द्रवले नाही. या घटनेतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी भाजपा आटापिटा करत आहे. 

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. दरम्यान, राहुल गांधी यांनी आरोपीच्या अटकेनंतर आता केंद्रीयमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही ट्विट केले आहे.  दरम्यान, अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या मंत्र्याला बडतर्फ ने करता, भाजपा न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण करत आहे, केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांची चिंता आहे, ना हत्याचे शिकार बनलेल्या भाजप कार्यकर्त्यांची, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. किसान को न्याय दो... असा हॅशटॅगही त्यांनी चालवला आहे.  प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन, मंत्र्यांचा पोरगा शेतकऱ्याच्या मुलाच्या हत्याप्रकरणात अटकेत आहे. मग, अजूनही मंत्र्याला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे. तसेच, नि:पक्ष न्याय आणि तपास होण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार