लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : रस्त्याने मोबाइलवर बोलत चाललेल्या युवकाचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़९) दुपारच्या सुमारास साईनाथनगर परिसरात घडली़अमृतवर्षा कॉलनीतील विजय निफाडे हा युवक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराबाहेर मोबाइलवर बोलत होता़ यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल हातातून खेचून नेला़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
युवकाचा मोबाइल खेचला
By admin | Updated: July 10, 2017 23:25 IST