शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

मजुराचं पोर आता आयआयटीत शिकणार; न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश; सरन्यायाधीश म्हणाले ‘गुड लक’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 07:27 IST

एका मागासवर्गीय मुलाला ठिकठिकाणी फिरविण्यात आले. केवळ १७,५०० रुपये शुल्क भरू शकला नाही, म्हणून काेणत्याही मुलाला प्रवेश नाकारायला नकाे. - सरन्यायाधीशांनी आयआयटीला सुनावले.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रवेश शुल्क भरण्याची मुदत अगदी थाेडक्यात हुकल्यामुळे एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला आयआयटी धनबाद येथे प्रवेश नाकारण्यात आला हाेता. मात्र, त्याला प्रवेश देण्याचे आदेश देणारा ऐतिहासिक निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने साेमवारी दिला. प्रतिभा अशा प्रकारे वाया जाऊ देऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने वरील आदेश दिले. न्यायालयाने कलम १४२द्वारे दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून विद्यार्थ्याला न्याय दिला. 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमाेर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटले की, एका मागासवर्गीय मुलाला ठिकठिकाणी फिरविण्यात आले. केवळ १७,५०० रुपये शुल्क भरू शकला नाही, म्हणून काेणत्याही मुलाला प्रवेश नाकारायला नकाे. याचिकाकर्त्याला आयआयटी धनबादमध्ये प्रवेश देण्यात यावा आणि शुल्क भरल्यानंतर ज्या कक्षेत प्रवेश मिळाला असता, त्याच कक्षेत प्रवेश दिला जावा, असे आदेश खंडपीठाने दिले. या निर्णयानंतर अतुल कुमारच्या गावात जल्लोष करण्यात आला.

नेमके काय झाले?अतुल कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ताे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील टिटाेडा या गावचा रहिवासी आहे. त्याचा आयआयटी धनबाद येथे इलेक्ट्रिकल शाखेत नंबर लागला हाेता.मात्र, २४ जून राेजी मुदत संपण्याच्या अवघ्या ४ मिनिटांपूर्वी आयआयटीची वेबसाईट बंद पडली. त्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नाही.त्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयाेग, झारखंड विधि सेवा प्राधिकरण आणि मद्रास उच्च न्यायालयाकडे दाद मागितली हाेती. त्यानंतर त्याने सर्वाेच्च न्यायालयात न्याय मागितला. यात त्याला यश मिळाले आहे.

शुल्क १७,५०० रुपये!nअतुलचे वडील दरराेज ४५० रुपये मजुरीतून कमावतात.nत्यांच्यासाठी १७,५०० रुपयांचे शुल्क गाेळा करणे कठीण हाेते. मात्र, गावकऱ्यांनी मदत केली.विशेषाधिकाराचा वापरnसर्वाेच्च न्यायालयाने मागासवर्गीय विद्यार्थ्याला न्याय देताना विशेषाधिकाराचा वापर केला. राज्यघटनेच्या कलम १४२ अंतर्गत न्यायालयाला हा अधिकार मिळाला आहे. nत्यानुसार, न्यायासाठी काेणताही आदेश जारी करण्याचा अधिकार सर्वाेच्च न्यायालयाला दिला आहे. त्यानुसार कोर्टाने हा आदेश दिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय