शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

लालूंच्या अडचणीत वाढ, ईडीकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 17:45 IST

बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आज अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पाटणा, दि. 27 - बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आज अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.2016 मध्ये रेल्वेमंत्री असताना लालूप्रसाद यादव यांनी आयआरसीटीसीचे बीएनआर आणि सुजाता या हॉटेलांच्या दुरुस्तीच्या कामांच्या निविदांमध्ये कथितरित्या भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांची पत्नी राबडीदेवी आणि लहान मुलगा तेजस्वी यादव यांच्याविरोधात सुद्घा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आज अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने 7 जुलै रोजी लालू प्रसाद यादव, पत्नी राबडीदेवी, मुलगा तेजस्वी यादव आणि आयआरसीटीसीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांसह पाच इतर पाच जणांविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. लालूप्रसाद यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापेमारीही केली होती. तसेच, सीबीआयने तिघांची चौकशी केली होती. सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आता ईडीनेही त्यांच्याविरोधातील कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, बेनामी संपत्तीप्रकरणी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची आधीच 180 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, आयकर विभागाने त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे.