Kunal Kamra Controversy: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा एक शो झाला. या शोमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक व्यंगात्मक गाणे गायले. त्यावरून वाद सुरू असून, या वादावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भूमिका मांडली आहे. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी असू शकत नाही', असे योगी म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या गाण्यावरून राजकारण ढवळून निघाले. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्षही बघायला मिळाला. शिंदेंच्या शिवसैनिकांनी ज्या स्टुडिओमध्ये कार्यक्रम झाला, त्याची तोडफोड केली. जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता योगी आदित्यनाथ यांनी सविस्तर भाष्य केले.
हेही वाचा >> शिवसेनेशी पंगा घेतलेल्या कुणाल कामरांची नेट वर्थ किती?
एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांना कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्याबद्दल विचारण्यात आले होते.
योगी आदित्यनाथ कुणाल कामराबद्दल काय बोलले?
योगी आदित्यनाथ म्हणाले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्या व्यक्तीवर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी असू शकत नाही. हे दुर्दैवी आहे की, काही लोक या देशाचे चीर हरण करण्यासाठी, आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणे, हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार समजत आहे", अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.
दरम्यान, कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कुणाल कामराला समन्सही बजावले आहे. कुणाला कामराला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, कुणाल कामराने एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. कुणाल कामराने खार पोलिसांना यासंदर्भातील पत्र पाठवले आहे.
माफी मागण्यास नकार
कुणाल कामराने उद्भवलेल्या वादाप्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे. सोशल मीडियावर निवेदन करत त्याने जे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले आहेत, तेच मी एकनाथ शिंदेंबद्दल बोलले असून, विधान मागे घेणार नाही, असेही म्हटले आहे.