शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावती’च्या वादावरून कुंभलगडची दारेही बंद, राजपूत समुदायाची ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 02:27 IST

पद्मावती चित्रपटावर पूर्ण बंदी आणावी या मागणीसाठी राजपूत समुदायाच्या शेकडो आंदोलकांनी शनिवारी राजसमंद जिल्ह्यात कुंभलगड किल्ल्यात प्रवेशबंदी केली. राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये स्थानिकांनी येथील किल्लाच पर्यटकांसाठी शुक्रवारी बंद केल्यानंतरच आजचे हे दुसरे आंदोलन आहे.

जयपूर : पद्मावती चित्रपटावर पूर्ण बंदी आणावी या मागणीसाठी राजपूत समुदायाच्या शेकडो आंदोलकांनी शनिवारी राजसमंद जिल्ह्यात कुंभलगड किल्ल्यात प्रवेशबंदी केली. राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये स्थानिकांनी येथील किल्लाच पर्यटकांसाठी शुक्रवारी बंद केल्यानंतरच आजचे हे दुसरे आंदोलन आहे.चित्तोडगढचे पोलीस अधिकारी ओमप्रकाश यांनी सांगितले की, चित्तोडगढमध्ये परिस्थिती सामान्य आहे. कुंभलगड येथील किल्ल्यात प्रवेशबंदी केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कुंभलगड हे राजा महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ आहे. चित्तोडगढमध्ये आंदोलनादरम्यान कथितरीत्या हवेत गोळीबार केल्याप्रकरणी भीलवाडाच्या एका व्यक्तीविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट असून दीपिका पदुकोण ही राणी पद्मीणी हिच्या मुख्य भूमिकेत आहे. (वृत्तसंस्था)

चित्रपट महोत्सवावर बहिष्कार टाकावा : शबाना आझमीमुंबई : चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ फिल्म इंडस्ट्रीजने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर (आयएफएफआय) बहिष्कार टाकावा, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केले आहे.- या परिस्थितीचा उल्लेख ‘सांस्कृतिक विनाश’असा करत शबाना आझमी यांनी या मुद्यावर मौन बाळगून असलेल्या माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे.- १९८९ मध्ये सफदर हाशमी यांच्या हत्येनंतर काँग्रेस दिल्लीत चित्रपट महोत्सवाची तयारी करीत होते तसेच सध्या होत आहे, असेही त्या म्हणाल्या. चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात होत आहे.

टॅग्स :Padmavatiपद्मावती