शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

टेकीला आलेल्या कुमारस्वामी सरकारला चमत्कारच तारेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 06:25 IST

आघाडीच्या एच. डी. कुमारस्वामी सरकारला गुरुवारी विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निदिव्यातून फक्त चमत्कारच वाचवू शकेल, अशी परिस्थिती कायम राहिली.

बंगळुरु/नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये गेले दोन आठवडे सुरू असलेल्या सत्तासंघर्ष नाट्याच्या तिढ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काहीच फरक न पडल्याने काँग्रेस-जद(एस) आघाडीच्या एच. डी. कुमारस्वामी सरकारला गुरुवारी विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निदिव्यातून फक्त चमत्कारच वाचवू शकेल, अशी परिस्थिती कायम राहिली. सत्तेचे बुडते तारू वाचविण्यासाठी सत्ताधारी आघाडीने बंडखोर आमदारांवर अपात्रतेचा बडगा उगारण्याखेरीज इतरही अनेक क्लृप्त्या शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने सत्तेच्या गणितात कोणताही फरक पडल्याचे दिसले नाही.१५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांवर सुयोग्य वेळी निर्णय घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्षांना दिली. त्याचबरोबर, मुंबईत ठाण मांडलेल्या या आमदारांना सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनास हजर राहण्याची सक्ती करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यानंतर, विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत बंडखोरांचे राजीनामे मंजूर वा नामंजूर करण्याचा कोणताच निर्णय घेतला नाही. बंडखोरांनी मात्र आम्ही राजीनाम्यांवर ठाम आहोत व काही झाले  तरी बंगळुरुला जाणार नाही, असे मुंबईत जाहीर केले. हे बंडखोर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सभागृहात न जाणे एवढेही कुमारस्वामी सरकार पडण्यास पुरेसे आहे. गुरुवारी मतदान होण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र घोषित करणे किंवा त्याचे राजीनामे नामंजूर करणे असे कोणतेही निर्णय घेतले तरी यात फरक पडेल असे दिसत नाही.विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यासाठी कुमारस्वामी सरकारला सभागृहात हजर राहून प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या आमदारांपैकी निम्मयाहून एक जास्त एवढ्यांचा पाठिंबा मिळवावा लागेल.विधानसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार असला तरी त्यांनी अगदी शेवटचा पर्याय म्हणून मतदान करणे अपेक्षित आहे. अध्यक्ष वगळून सभागृहाची सदस्यसंख्या २२४ आहे. त्यातून १६ बंडखोर वगळले तर ही संख्या २०८ वर येते.बंडखोरीमुळे सत्ताधारी आघाडीची सदस्यसंख्या १०० वर आली आहे. तर विरोधी भाजप व त्यांचे पाठीराखे दोन अपक्ष यांची १०७ ही संख्या कायम आहे.त्यामुळे याच पद्धतीने मतदान झाले तर विश्वासदर्शक ठराव फेटाळला जाईल हे सहज कागदावर मांडता येणारे गणित आहे. म्हणूनच एखादा चमत्कारच सरकार वाचवू शकेल, अशी स्थिती आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण