शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 20:48 IST

Kumari Selja : सिरसाच्या खासदार कुमारी सैलजा यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर) कालनवली येथे निवडणूक प्रचार केला.

Haryana Assembly Elections 2024 : हरियाणात पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच, हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. दरम्यान, काँग्रेसमध्ये दलित समाजातून मुख्यमंत्री होऊ शकतो. दलित समाजाचीही ही मागणी आहे. काळानुरूप बदलही होत असतात. राहुल गांधींनाही दलित समाजाला पुढे आणायचे आहे आणि मुख्यमंत्री कोणाला करायचे हा निर्णय हायकमांड घेईल, असे काँग्रेसच्या खासदार कुमारी सैलजा यांनी सांगितले आहे.

सिरसाच्या खासदार कुमारी सैलजा यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर) कालनवली येथे निवडणूक प्रचार केला. काँग्रेसचे उमेदवार शिशपाल केहरवाला यांच्या समर्थनार्थ कुमारी सैलजा यांची जाहीर सभा झाली. यावेळी कुमारी सैलजा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, हरियाणात भाजपचा सफाया झाला आहे. काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे, मी मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आहे. तसेच, भाजप असे डावपेच अवलंबते. जनता भाजपच्या डावपेचांना कंटाळली आहे.

याचबरोबर, १० वर्षांपासून हरियाणा राज्यात भाजपचे चांगले सरकार नाही, तर वाईट सरकार आहे. सरकारी पोर्टलमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. केंद्र आणि राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार अपयशी ठरले आहे. भाजपला एकमेव पर्याय फक्त काँग्रेस हाच आहे. २०१९ मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही. जेजेपीच्या १० आमदारांनी भाजपच्या विरोधात मते मागितल्याने भाजप सत्तेवर आले. आता हरियाणात भाजप आणि जेजेपीच्या विरोधात मतदान होणार आहे, असे म्हणत कुमारी सैलजा यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, हरियाणातील विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येईल, तसं राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत आहेत. तसेच, काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याचे दिसून आले. तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात होती. यातच भूपेंद्र हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे भूपेंद्र हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणाcongressकाँग्रेस