नवी दिल्ली - जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान, कुमारस्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधीसोबत कर्नाटक सरकारमधील मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली. काँग्रेसच्या नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर कुमारस्वामी यांनी इथे कोणत्याही प्रकारची सौदेबाजी झालेली नाही. आम्ही कर्नाटकमध्ये एकजुटीने काम करू. तसेच राज्यात काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) हे पक्ष एक स्थिर सरकार देतील, असे सांगितले. दरम्यान, नव्या सरकारमधील उपमुख्यमंत्रिपदावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.
कुमारस्वामींनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उपमुख्यमंत्रिपदावर निर्णय उद्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 21:33 IST