शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर सापडला मुहूर्त, बुधवारी होणार शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:32 PM

महत्त्वपूर्ण खात्यांवरील रस्सीखेचीमुळे खोळंबलेला कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारास अखेर मुहूर्त सापडला आहे.

बंगळुरू - महत्त्वपूर्ण खात्यांवरील रस्सीखेचीमुळे खोळंबलेला कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारास अखेर मुहूर्त सापडला आहे. आता बुधवारी जेडीएस आणि काँग्रेसचे मंत्री शपथ घेतील. कुमारस्वामी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जेडीएसच्या नऊ मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती देताना कुमारस्वामींनी सांगितले की," मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या फेरीत जेडीएसच्या आठ ते नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. तसेच जेडीएसच्या वाट्याला येणारी दोन ते तीन मंत्रिपदे रिक्त ठेवली जातील."  कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते जी. परमेश्वर यांनीही कर्नाटकमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उद्या (बुधवारी) दुपारी एच. डी. कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

 दुसरीकडे  मंत्रिमंडळातील जागा आणि खातेवाटपावरून जेडीएसच्या आमदारांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त कुमारस्वामी यांनी फेटाळून लावले आहे. तसेच पक्षाध्यक्ष एचडी देवेगौडा यांना पुढील फेरीतील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात  आल्याचेही कुमारस्वामी यांनी सांगितले.  काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आघाडीबाबत करार झाला असून, या करारानुसार काँग्रेसला मंत्रिमंडळातील 22 मंत्रिपदे आणि जेडीएसकडे 12 मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसकडे गृह, सिंचन, आरोग्य, कृषी आणि महिला व बालकल्याण विभाग, तर जेडीएसकडे वित्त, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पर्यटन आणि परिवहन मंत्रालये असतील.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाPoliticsराजकारण