शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आशिष खेतान यांच्या राजीनाम्यानंतर कुमार विश्वास यांचा केजरीवालांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:12 IST

आपचे नेते कुमार विश्वास यांनी आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देआपच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. 'आम्ही चंद्र गुप्त बनविण्यासाठी गेलो होते. मात्र, वाटले नव्हते चंदा गुप्ता बनेल'कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केली टीका

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या (आप) अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आता पत्रकार आशिष खेतान यांनी 'आप'च्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन आपचे नेते कुमार विश्वास यांनी आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

कुमार विश्वास यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांना खुर्चीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी योगदान दिल्याचे कुमार विश्वास म्हणाले आहेत. याचबरोबर, एका ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'आम्ही चंद्र गुप्त बनविण्यासाठी गेलो होते. मात्र, वाटले नव्हते चंदा गुप्ता बनेल'. आपचे नेते आशुतोष यांनी सुद्धा राजीनामा दिल्यानंतर कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. 

दरम्यान, आपचे नेते आशिष खेतान यांनी काही खासगी कारणांसाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे 15 ऑगस्ट रोजी ई-मेलच्या माध्यमातून राजीनामा सुपूर्द केला आहे. वकिलीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकारणापासून थोडे दूर होत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे ट्विट केले आहे. खेतान हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. याआधीही खेतान यांनी दिल्ली डेव्हलपमेंट कमिशनच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची या कमिशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीNew Delhiनवी दिल्ली