शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर कुमारांना अ'विश्वास', ट्विट करुन उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 22:57 IST

अर्थमंत्र्यांनी मंदीचे कारण देताना, लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-6 मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे

नवी दिल्ली - ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या मंदीची झळ बसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी काही दिवसांसाठी आपल्याकडील निर्मिती थांबवली आहे. तसेच या क्षेत्राशी संबंधित असलेल्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रात आलेल्या मंदीसाठी अजब कारण सांगितले आहे. ओला, उबेरसारख्या टॅक्सी सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद हा कारच्या विक्रीवर प्रभाव पाडत आहे, असं सितारमण यांनी म्हटलं होतं. सितारमण यांच्या या वक्तव्याचा नेटीझन्सने चांगलाच समाचार घेतला आहे.   

अर्थमंत्र्यांनी मंदीचे कारण देताना, लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-6 मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे, असे सांगितले. ''आजकाल लोकांचा कल हा गाडी खरेदी करून ईएमआय भरण्यापेक्षा मेट्रो तसेच ओला, उबेरमधून प्रवास करण्याकडे वाढला आहे. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात निर्माण झालेली समस्या ही गंभीर आहे. तसेच याच्यावर तोडगा काढला गेला पाहिजे.'', असे सितारमण यांनी म्हटले आहे. सितारमण यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियातून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवि कुमार विश्वास यांनीही एका ट्विटद्वारे निर्मला सितारमण यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.  आयफोन अपेक्षेप्रमाणे विकला जात नाही. मंदी हे कारण नसावे. बहुतेक नोकियाच्या जास्तीच्या प्रयोगामुळे ओलावृष्टीमुळे उभार नाही घेतली, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये ओला आणि ऊबर यांना कोट करुन सितारमण यांना लक्ष्य केले आहे. विश्वास यांच्या या ट्विटला 27 हजार 500 लोकांनी लाईक केले असून हजारोंनी रिट्विट करत अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावरून त्यांची खिल्ली उडवली आहे. 

'आई फ़ोन अपेक्षा के अनुसार नहीं बिक रहा. मंदी कारण नहीं है...लगता है 'नोकिया' के ज्यादा प्रयोग की 'ओला' वृष्टि से 'ऊबर' नहीं पाया.   दरम्यान, ''आम्ही सर्वच क्षेत्रामधील समस्यांकडे गांभीर्याने पाहतो. तसेच त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी कटीबद्ध आहोत. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठी आवश्यक त्या घोषणा करण्यात आल्या आहेत तसेच गरजेनुसार अजून काही घोषणा केल्या जातील.'', असे आश्वासनही सितारमण यांनी मंदीतून सावरण्यासाठी दिले आहे.   

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्थाTwitterट्विटर