शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नापाक ! कुलभूषण जाधवांवर पाकिस्तान दबाव टाकून बोलायला भाग पाडतोय - परराष्ट्र मंत्रालय   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 09:24 IST

पाकिस्ताननं पुन्हा एकदा खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचा आणखी एक व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पाकिस्ताननं पुन्हा एकदा खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचा आणखी एक व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जाधव असे सांगत आहेत की, 'आई काळजी करू नकोस. येथे (पाकिस्तानात) माझी काळजी घेतली जात आहे आणि या लोकांनी मला स्पर्शदेखील केलेला नाही. मला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ती (आई) माझ्यावर विश्वास ठेवेल'. 

या व्हिडीओमध्ये जाधव आपला गुन्हा कबुल करत  आहेत आणि पुढे असेही सांगत आहेत की, मला भारतातील जनता, भारत सरकार व नौदलातील लोकांसोबत एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट सांगायची आहे की भारतीय नौदलातील माझी नोकरी गेलेली नसून मी आजही नौदलातील अधिकारी आहे.  दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव टाकून जबरदस्तीनं ही वक्तव्य करण्यास त्यांना भाग पाडलं जातं व त्यानंतर यासंबंधीचा पाकिस्तानकडून व्हिडीओ जारी करण्यात येतो, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटले आहे. 

दुसरीकडे, मागील आठवड्यात त्यांच्या आई व पत्नीबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेखही त्यांनी आपल्या व्हिडिओत केला आहे. मात्र या भेटीचा ज्या पद्धतीनं जाधव यांनी उल्लेख केला आहे त्यावरुन पाकिस्तानचा नीचपणा स्पष्ट दिसत आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये भारताविरोधात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानानं केल्याचं  स्पष्टपणे दिसत आहे. आई जेव्हा भेटली तेव्हा भारतीय उप-उच्चायुक्त जे.पी.सिंह तिला  ओरडत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. खरंत भेटीदरम्यान भारतीय उप-उच्चायुक्तांना काचेच्या एका वेगळ्या भिंतीमागे ठेवण्यात आले होते. जेथे ते जाधव व त्यांच्या आई-पत्नींमधील संभाषण ऐकूदेखील शकत नव्हते तसंच कोणताही हस्तक्षेप करण्यासही वाव नव्हता.

पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर 

या व्हिडीओमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. कारण पाकिस्ताननं स्वतःच म्हटले होते भारतीय अधिका-यांना जाधव कुटुंबीय भेटीदरम्यान सहभागी होऊ दिले नाही. भेट झाल्यानं आई खूश झाली,  असे जाधव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. पाकिस्तानकडून चांगली वागणूक मिळत असल्याचंही, जाधव यांच्याकडून वदवून घेण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांचा जारी करण्यात आलेल्या नवीन व्हिडीओमुळे आश्चर्यचकित करणा-या कोणत्याही गोष्टी नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटले आहे. पाकिस्तान जाधव यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून गोष्टी वदवून घेत आहे आणि त्यानंतर त्यांचा व्हिडीओ जारी करत आहे.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान