शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव यांना कुटुंबाला भेटता येणार, आई-पत्नीला भेटणार 25 डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 14:52 IST

 हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी त्यांच्या पत्नी व आईला देण्यात आली आहे.

मुंबई-  हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी त्यांच्या पत्नी व आईला देण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिओ न्यूज'नुसार, कुलभूषण जाधव आणि पत्नी-आईच्या भेटीवेळी भारतीय दूतावासाचे अधिकारीही उपस्थित असतील, असं फैजल यांनी सांगितलं. याआधी पाकिस्तानकडून फक्त कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. 

 

10 नोव्हेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना पाकिस्तानात भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. मानवतेच्या भावनेतून कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात येत असल्याचं पाकिस्तानने म्हटलं होतं .त्यानंतर कुलभूषण जाधव यांना आईलाही भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. तसंच आई आणि पत्नीच्याही सुरक्षेची हमी देण्यास सांगितलं होतं. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली होती.

दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्विट करून याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे. कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीला पाकिस्तानात येण्याचा व्हिसा देण्यात येत असल्याचं पाकिस्तान सरकारने सांगितलं आहे. याबद्दलची माहिती कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव यांनी दिल्याचं सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

 

भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या ४६ वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी १३ डिसेंबर रोजी दिले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान