शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

"भगवान राम सीतेसोबत बसून दारू प्यायचे अन्..." कन्नड लेखकाचे श्रीरामाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:08 IST

कन्नड लेखक के.एस. भगवान यांनी प्रभु श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे.

Controversial statement on Lord Rama: प्रसिद्ध कन्नड लेखक आणि तर्कवादी के.एस.भगवान यांनी श्रीराम आणि माता सीतेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. ''वाल्मिकी रामायणनुसार, भगवान राम दररोज दुपारी पत्नी सीतेसोबत बसून दारू प्यायचे. राम सीतेला जंगलात पाठवायचा, पत्नीची कधीच काळजी घेतली नाही'', असे वादग्रस्त विधान के.एस. भगवान यांनी केलं आहे. ते 20 जानेवारी 2023 रोजी कर्नाटकातील मंड्या येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

'राम कसा कुणाचा आदर्श असू शकतो?'के.एस. भगवान म्हणाले, ''सध्या रामराज्य बनवण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण, वाल्मिकी रामायणातील उत्तरकांड वाचून लक्षात येईल की, राम आदर्श नव्हते. त्यांनी 11,000 वर्षे नाही तर केवळ 11 वर्षे राज्य केलंय. राम दररोज दुपारी सीतेसोबत बसायचे दारू प्यायचे. ते पत्नी सीतेला जंगलात पाठवायचे आणि कधीच तिची काळजी घेतली नाही. रामाने झाडाखाली बसून तपश्चर्या करणाऱ्या शूद्र शंबुकाचा शीरच्छेद केला. राम कसा कुणाचा आदर्श असू शकतो?'' असे विधान केले आहे.

के.एस. भगवान यांना तुरुंगात टाकण्याची भाजपची मागणीकेएस भगवान यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकातील भाजप नेते चांगलेच संतापले आहेत. भाजप नेते विवेक रेड्डी यांनी सरकारकडे लेखकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विवेक म्हणाले- "हा अत्यंत अश्‍लील आणि घृणास्पद प्रकारचा हल्ला आहे. यातून के.एस. भगवान यांची गरीब मानसिकता दिसून येते. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. हे इतर देशात बोलले असते, तर त्यांची काय अवस्था झाली असती. भारत खूप सहनशील आहे. आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करू शकत नाही." असे ते म्हणाले.

याआधीही रामावर वादग्रस्त वक्तव्य केले आहेभगवान राम यांच्याबाबत केएस भगवान यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही त्यांनी दावा केला होता की, ''प्रभू राम नियमितपणे दारू पितात आणि त्यांनी सीतेलाही दारू पाजली होती.'' त्यांनी त्यांच्या 'राम मंदिर याके वेद' या पुस्तकातही याबद्दल लिहिले आहे. त्यांनी त्या पुस्तकात रामायणाविषयी असे काही शब्द लिहिले होते, जे वादग्रस्त ठरले. हे प्रकरण इतके वाढले की सरकारला त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवावा लागला. याशिवाय, 2015 मध्ये केएस भगवानने हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेची काही पाने जाळणार असल्याचे म्हटले होते. यानंतर पोलिसांनी लेखकावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :Karnatakकर्नाटकRam Mandirराम मंदिरBJPभाजपा